Arangaon (अरणगाव)

अरणगाव, ता. जि. अहमदनगर


अरनगांव (अरन्यग्राम) च्या नैर्ऋत्येस दोंड-मनमाड लोहमार्गाच्या पश्चिमेस मंदीरात व मंदीराचे मागच्या बाजुला मुख्य स्थाना सहीत एकुण 7 स्थाने आहेत.


जाण्याचा मार्ग :

अरणगाव, अहमदनगर,-दौंड मार्गावर अहमदनगरहून दक्षिणेस 8 कि. मी. आहे. अरणगावला जाण्यासाठी अहमदनगरहून एस. टी. बस सेवा व सिटी बस सेवा उपलब्ध आहे. नेप्तीहून आग्नेयेस अरणगाव, (केडगावमार्गे) 9 कि. मी. आहे. नेप्ती ते अरणगाव (अहमदनगर मागे) 14 कि. मी. आहे. अरणगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. तसेच स्थानालगतच श्रीचक्रपाणी आश्रमही आहे.


स्थानाची माहिती :

1. पूजा आरोगणा पहुड स्थान :

हे स्थान अरणगावच्या नैर्ऋत्येस दोंड-मनमाड लोहमार्गाच्या पश्चिमेस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नागनाथाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात नारायणडोहहून अरणगावला आले. त्याच दिवशी या ठिकाणी दुपारचा पूजावसर झाला. आरोगणा झाली. पहड उपहड झाला.(उ.ली. 276, वि. स्था. पो. 1625)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. वेढे स्थान :

हे स्थान पूजा आरोगणा स्थानापासून दक्षिणेस तीन फूट अंतरावर आहे.

लीळा : येथे पूर्व-पश्चिम उत्तराभिमुख पटीशाळा होती. त्या पटीशाळेवर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू वेढे करीत असत. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पूजा, आरोगणा स्थानापासून 10 फूट अंतरावर असलेले सभामंडपातील दक्षिण बाजूचे व उत्तर वाजूचे स्थान निर्देशरहित आहे. तसेच पूजा आरोगणा स्थानापासून 27 फूट 6 इंच अंतरावरील सभामंडपातील स्थान निर्देशरहित आहे. सभामंडपातील दक्षिण भिंतीलगतचे खिड़की स्थान निर्देशरहित आहे.


3. सोंडी आसन स्थान :

हे स्थान देवळाच्या मुख्य दरवाजाच्या आत उत्तर बाजूस सभामंडपात आहे.

लीळा : 1. सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू नारायणडोहाहून आल्यावर प्रथम त्यांना येथे आसन झाले. त्या वेळी द्रविळासबाइसा, आपले अंग घामाने भरले म्हणून समोरून वाहत असलेल्या ओढ्यावर हात पाय धुण्याकरिता गेल्या. बाह्या मागे सारून हात काखेपासून उघडे करून धुऊ लागल्या, त्यामुळे बाइसा त्यांना रागावल्या. सर्वज्ञांनीही हा प्रकार पाहिला. हात पाय धुतल्यावर द्रविळासबाइसा सर्वज्ञांकडे आल्या. तेव्हा सर्वज्ञांनी त्यांना शिक्षापण केले आणि सांगितले, ‘लज्जारूप धर्म स्त्रियांच्या शीलाचे रक्षण करणारा आहे. म्हणून तुम्ही लज्जेनेच वागले पाहिजे.” (उ. ली, 276 स्था. पो.)

2. ज्यावेळी गुरवाचे आसुचे नारळ चोरीस गेले, त्या प्रसंगी साधा गुरवाला अपशब्द बोलली. तेव्हा सर्वज्ञांनी साधाला येथेच शिक्षापण केले. (उ. ली. 277)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. लाहामाइसाची विचारपूस करने स्थान :

हे स्थान मंदिराच्या पश्चिमेस ओहळाच्या कडेला उंचवट्यावर देवळात आहे.

लीळा : साधाची आई लाहामाइसा ती आजारी होती. तिला ताप आलेला होता. तेव्हा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंनी येथे येऊन तिची विचारपूस केली. त्या वेळी लाहामाइसा म्हणाली, “असा ताप मला जन्मोजन्मी यावा, की ज्यामुळे सर्वज्ञ माझी नेहमी विचारपूस करतील” मग या ठिकाणी सर्वज्ञांना थोडा वेळ आसन झाले. (उ. ली. 279, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


5. आसन स्थान :

हे स्थान लाहामाइसाची विचारपूस करणे स्थानापासून ईशान्येस 59 फूट 6 इंच अंतरावर चिंचेच्या झाडाखाली आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


6. लघु परिश्रय स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून ईशान्येस 15 फूट अंतरावर आहे. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


7. अवस्थान स्थान :

हे स्थान लघु परिश्रय स्थानापासून उत्तरेस 64 फूट 6 इंच अंतरावर ओहळाच्या पलीकडे आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गुरवाची गुंफा होती. त्या गुंफेतील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात मांडवगणहून अरणगावला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी 15 दिवस वास्तव्य होते. (प. ली. 157त. प्र. स्था. पो.) व उत्तरार्ध काळात नारायणडोहाहून अरणगावला आले. त्या वेळी त्यांचे येथे एक महिना वास्तव्य होते. (उ. ली. 276. स्था. पो.)

येथील इतर लीळा : 1. उपासनीयां लाठी घालणे. (पू. ली. 159)
2. देमती अद्रकत्वचाग्रहणी शिक्षापण. (पू. ली. 354)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

पूर्वार्धातील 15 दिवसांच्या वास्तव्यानंतर व उत्तरार्धातील एक महिन्याच्या वास्तव्यानंतर दोनीही वेळा सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून भिंगारला गेले.


अनुपलब्ध स्थान :

1. गुंफेच्या अंगणातील मादने स्थान.
2. गुंफेच्या दक्षिणेच्या शेतातील विहरण स्थान.
3. गुंफेच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.
4. नागनाथ देवळाच्या पश्चिमेच्या पटीशाळेवरील वेढे स्थान.
5. नागनाथ देवळाच्या दक्षिणेचे लघु परिश्रय स्थान.


अरणगावची एकूण स्थाने : 12


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: