Anwa (आनवा)

आन्वा, ता. भोकरदन, जि. जालना

येथील 1 स्थान - हे स्थान आन्वा गावाच्या उत्तरेकडे गावालगतच आहे. याला दत्त मंदीर म्हणुन ओळखतात.

जाण्याचा मार्ग :

आन्वा हे गाव, गोळेगाव-पारध सडकेवर गोळेगावहून किंचित् आग्नेयेस 9 कि.मी. आहे व पारधहून किंचित नैर्ऋत्येस 23 कि.मी. आहे. गोळेगाव, औरंगाबाद-जळगाव सडकेवर आहे; सिल्लोड ते आन्वा (गोळेगाव मार्गे) 28 कि.मी; अजिंठा ते आन्वा 20 कि.मी; भोकरदन ते आन्वा (विरेगाव, वाडी बु. वाकडी मार्गे) 24 कि.मी. आन्वा येथे जाण्यासाठी एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. भोकरदन च्या स्थानापासून उत्तरेस आन्वा (वाडी बु. वाकडी मार्गे) 16 कि.मी. आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.

स्थानाची माहिती :

1. अवस्थान स्थान :

हे स्थान आन्वा गावाच्या उत्तरेस एक फर्लाग अंतरावर देवमळ्यात उत्तराभिमुख देवळात आहे. हे देऊळ ‘श्रीदत्त मंदिर’ या नावाने प्रख्यात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे आंब्याचे बन होते. बनात गढरू आंबा होता. त्या आंब्याच्या झाडाखालील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात सिल्लोडहुन आन्व्याला आले. त्यांचे या ठिकाणी 15 दिवस वास्तव्य होते. (पू.ली. 428, स्था.पो) त्यानंतर ते येथून चारनेरला गेले.

येथील इतर लीळा : 1. आंबेबनाचे रक्षण करणारे बनकर दररोज सर्वज्ञांना पाचपाच आंबे अर्पण करीत असत. (पू.ली. 429)

2. उपाध्ये शेंदुर्णीहून रिद्धपुरला श्रीप्रभूच्या दर्शनाला गेले होते. ते रिद्धपूरहुन आन्व्याला परत आले. येथे सर्वज्ञांची भेट झाली. सर्वज्ञांनी उपाध्यांना सर्व क्षेमवार्ता विचारली. त्यानंतर त्यांना तृप्त होईपर्यंत आंबरसाचे भोजन दिले. (पू.ली. 430)

3. देमाइसाला स्वेच्छेने राहावणे. (पू.ली. 434)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

येथील इतर चार स्थाने निर्देशरहित आहेत.

अनुपलब्ध स्थाने :

1. देमाइसा झोळी धुता शिक्षापण स्थान.

2. संसारमोचक आंबा कथन स्थान.

3. गुढरू आंब्याच्या उत्तरेचे परिश्रय स्थान.

4. पाटाच्या उत्तरेचे निळ अनिळ आंब्याखालील स्थान.

5. देमाइसाप्रति अंब्रग्रास दरीसन स्थान.

आन्व्याची एकूण स्थाने : 6

  • Purvardha Charitra Lila – 428
  • Anwa : आनवीं बनीं अवस्थान :।।:
  • गोसावी आनवेयासि बिजें केलें: गावांउत्तरें आंबेंयाचे बनः तेथ थोर गुढरू आंबा होताः तयातळीं गोसावियांसि अवस्थान जालें: दिस वीसः उदेयांचि बनकर पाटासि हातपाय धुआवेया येतिः हातपाये धूतिः मुखप्रक्षाळण जालेयानंतरें आपुला नेम सारीतिः पांचीपांच आंबें प्रतिदीनीं गोसावियांसि दरीसन करीतिः नमस्कार करौनि जातिः जो ये तो ऐसेचि करीः समस्तही बनकर प्रत्यहीं ऐसाचि वीधि सारेतिः बाइसें एर आंबें माची लावीति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 429
  • Anwa : प्रतदीनी बनकरआंब्र भेटि
  • उदीयांचि बनकर पाटासि हातपाए धुआवेया एतिः हातुपाए धूतिः पांचपांच’ आंबे प्रतदीनी गोसावीयांसि दरीसनां करीति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 430
  • Anwa : द्रीढ पुरूखागमनीं अंब्र/आम्र वेचानुवादु :।।:
  • आंबें बहुत साचिलेः एकी दिसीं बाइसीं पुसिलें: ‘बाबाः आंबें बहुत सांचलेः पाका आलेः आतां थारतिलनाः आणि बाबाही वेचीतीनाः ना कोण्हाते वेचूं देतिः तरि आतां काइ करूं?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः द्रीढपुरूख येति आणि आंबेंयां वेचु होइलः’’ बाइसीं म्हणितलें: ‘‘हो कां बाबाः’’ ऐसें गोसावी तयाकारणें व्रतस्थु जालें: ऐसें तें कणवेचें सदैव सभाग्य :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 430
  • Anwa : उपाध्यां भेटिः अंब्र/आम्र वेचु करणें :।।:
  • तवं उपाध्यें परमेस्वरपुरूनि आले देखौनि गोसावी सामोरेया बिजें केलेः गोसावी भुजादंड पसरूनि क्षेमाळिंगन दिधलें: तिहीं दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: पानेपोफळे आसनावरि ठेउनि पुढां बैसलेः गोसावी आनुकरूनी श्रीप्रभुची क्षेमवार्ता पुसिलीः मग गोसावियांपुढां मागिल वृतांत सांघो आदरिलें: निगाले तेथौनि श्रीप्रभुंची भेटिवरि सांघितलें: ‘श्रीप्रभु आंबेयाचा प्रसादु दिधलाः’ याउपरि सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नेणिजे श्रीप्रभुंची लीळा कव्हणी वेळां कव्हणा जीवां काइ देतिः’’ मग गोसावी आंबेंप्रधान करौनि उपहारू करविलाः बाइसांकरवी मांडे करविलेः आंबें पीळवलेः मग गोसावी आपुलिया पांती जेवविलेः उपाध्यें मुख्य भक्तिजन गोसावियांसि रसु प्रधान आरोगणा जालीः गोसावी उपाध्यां वेळोवेळां रसु वाढवीतिः साकर घृत घालवीतिः प्रसादु देतिः मध्यें बाइसांकरवी वाणीयेचे आंबें देववीतिः ऐसीं दुपाहारीची आरोगणा जालीः मागुता विळीचां व्याळीये रसु मांडे वाढवीतिः ऐसें गोसावी तेयांकरवी तृप्तिपर्येंत आंबें खावविलेः बाइसें प्रतिदीनीं गोसावियांसि आंबें मांडे आरोगणा देति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 431
  • Anwa : देमतीं अंब्रग्रासु कथन/दरीसन :।।:
  • एकु दीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालाः भक्तिजना अवसरू दिधलाः विहरणां बिजें केलेः आंबेंयातळीं आसन जालें: तो झोपाळा आंबेः ताचे आंबें खाली लोंबतिः तें देखौनि गोसावी देमाइसांतें म्हणितलें: ‘‘देमतीः तुम्ही ऐसयांचि निजावें: आ करावाः आणि ऐसयांचि आंबें तोंडीं घालावें: लपकरि आंबा तोंडी रीगैलः’’ ऐसें गोसावी दाखविलें: आणि तेहीं निजैलीः आंबा मुखी सुदलाः तीनितीनि आंबें तोडिलेः मग पूरे केलें: गोसावी हास्य केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 432
  • Anwa : संसारमोचकु अंब्र/आम्र कथन :।।:
  • एकु दिसीं गोसावियांसि उदेयाचां पूजावसर जालाः विहरणा बिजें करीत असतिः सवे भक्तिजनें असतिः तवं एका आंबेंयाचें आंबें वरि तैसेचि असतिः आणि खाली तैसेचि पडिले असतिः तें देखौनि भक्तिजनीं पुसिलें: ‘‘जी जीः हें अवघे आंबें काढीत असति तरि या आंबेंयाचे आंबें कोण्ही काढीतिनाः नेति नाः तें काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा आंबा संसारमोचकु गाः’’ भक्तिजनीं पुसिलें: ‘‘संसारमोचकु म्हणिजे काइ जी?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हा आंबा खाइजे आणि संसारापासौनि मुंचिजेः हा आंबा खाये तयासि ज्वरू येः तो मृत्यूतें पावेः’’ मग भक्तिजनी बनकरांतें पुसिलें: ‘‘हां गाः हें अवघे आंबें उतरिता तरि या आंबेंयाचे आंबें नुतरा तें काइ?’’ तेही म्हण्ीतलें: ‘‘हे आंबें जो खाए तयासि तत्क्षणीं ज्वरू येः ये आंबें पाखिरूवेंहीं न खातिः म्हणौनि या आंबयाचे आंबें कोढजतिनाः’’ भक्तिजनीं पुसिलें: ‘‘तरि हें काइ किजेत?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘ना हें मीठमोहरीयांआंतु दाटिजतिः मग एरे वरूषीचें एरे वरूषीं खावों येतिः’’ मग तयासि साच मानलें: आश्चर्य जालें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 433
  • Anwa : देमती झोळी धुता सीक्षापण :।।: / तथा भिक्षान्नप्रशंसापूर्वक शिक्षापण :।।:
  • एकु दिसीं देमाइसें झोळी धुआवेया पाटासि गेलीं: झोळीयेसि अन्न उरलें होतें: तें पाटीं पुंजा केलें: झोळी धुतलीः तवं तेथ मागिलाकडौनि गोसावी बीजें केलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हें कोणें गा केलें? देमती हें ऐसें कोणें केलें?’’ तिया म्हणितलें: ‘‘जीजीः हें मीया ठेविलें: उरलें होतें तें मियां पुंजा केलें:’’ मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः ऐसें कां केलें?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः खाति बापुडे मासेः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पोरे होः जैसे मासे तैसें तुम्ही? एथौनि तुमची थोरी सांघिजैल तरि तुमचें माथेया डोळें जातिः पोरे हो तुमचा महिमाः तुमचे एथौनि गुण अनुवादजतील तरी आकाशा टेंकालः जे तुम्हा जेविलेया होइलः तें जळचरें खादलेया होइल?’’ तियां म्हणितलें: ‘‘जी जी तरि माथेयां डोळे कव्हणें प्रकारें न वचेतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘जवं जवं जाणताः तवं तवं नेणताः ऐसें जो आपणेयांतें अखंड म्हणवी तेणें न वचेतिः हें भिक्षान्न कीं हें पवित्रचें पवित्र कीं: दुर्लभाचे दुर्लभ कीं बाइः भिक्षान्न सांडावें नाहीं: कव्हणां द्यावें नाहीः कव्हणां सुआवें नाहीं: लागैल तेंचि मागावें: आपुलें सीत मुंगिये आदिकरौनि नेवों नेदावें: राहिला कणु झोळी धुतां अन्यभजन घडेलः अन्यभजनें पुरूख धर्मापासौनि जायेः’’ म्हणौनि गोसावी अवघीं सीतें वेचविलेः ऐसें गोसावी शिक्षापण केलें:’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी मीं नेणेंचिः आजीपासाव ऐसें न करीं:’’ म्हणौनि नमस्कारू केला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 434
  • Anwa : देमाइसांतें स्वइच्छा राहावणें :।।: / तथा गायनप्रसंगें सन्निधानानुज्ञा :।।:
  • एकु दिसीं बाइसां आणि देमाइसां भांडण जालें: मग बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः या दवडावियाः भांडती असतिः’’ गोसावी उगेचिः मग उदेयांचि देमाइसें गोसावियांचिया पूजावसरा आलीः पूजावसर जालाः तिहीं पाहिलाः मग देमाइसांतें गोसावी पाठउं आदरिलें: ‘‘देमतीः तुम्हीं आपुला स्वेच्छा राहाता आणि स्वेच्छा जाताः तुम्हीं मासु दी होतीतिः आता तुमचा मासु दी जालाः आता तुम्हीं एथौनि जाः’’ तियें कोमाइलीः म्लानवदनें जालीं: मग देमाइसीं म्हणितलें: ‘‘ना जीः आम्हासि गोसावी राहों देयावे जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमती आतांची तवं जाः मग मागुती पुढां भेटाः’’ यावरि देमाइसीं आळवा म्हणीतलिया :।।: ‘‘पाउले म्हणितलें: न करीति हरीः आतां कव्हणीये परिः जावों आम्हीं :।।:1 :।।: तुझां श्रीचरणीं: रंगलें मनः काइसेया कान्हाः पाठवीसी :।।:2 :।।: निर्विकारा जोगीयाचें: निष्ठुर वो चित्तः असो संभ्रमितः तुझा चरणीं :।।:3 :।।: तुझेन वेधें: असो संभ्रमिताः तू काइसे अनंताः पाठवीसि :।।:4 :।।: शिणाची उत्तरेः जिव्हार भेदलेः आता जळो हे जियालेः तुजविण :।।:5 :।।:’’मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः एथ तुम्हां असों आवडैलः तवं असों दीजैलः आतां तुम्हां स्वइछा असावेया अनुज्ञा हो आतां एथौनि तुमतें पाठवीजेनाः तुम्हीं हुनि जाल तरि जाः’’ मग तिहीं म्हणितलें: ‘‘न वचें जीः’’ म्हणौनि नमस्कारू केला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 435
  • Anwa : एकाइसाकरवी वाटी धुववणे :।।:
  • एकु दीं गोसावी चारनेरां बिजें करितां मार्गी कव्हणें एकें ठाइं गोसावी आसनीं उपविष्ट असतिः तवं देमाइसें आणि एकाइसें दोघी जेविलीयाः एकाइसें देमाइसेंवरि आपुली उसटी वाटी सांडुनि उठिलीः गेलीः देमाइसें तयाचि वाटी धुवावेया घेउनि निगो बैसलीः तवं सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः हे वाटी कोणाची?’’ देमाइसी म्हणितलें: ‘‘ना जीः एकाइसीं धुवावया दिधलीं:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तुम्हीं आपुली वाटी धुवा आणि जाः हें वाटी तैसीचि असों देयाः ठेवाः’’ मग देमाइसी आपुली धुतली आणि निगालीः तवं गोसावी एकाइसातें म्हणितलें: ‘‘बाइः याः आपुली वाटी नेयाः तुमचां ताटकाढा तो बाहीरि एका म्हणिया गेला असेः’’ आणि म्हणितलें: ‘‘स्वयंदास्यं पतिस्वनाम्ः’’ मग तियें आपुली वाटी घेउनि गेलीः तियें दिउनि देमाइसासि आपुली वाटी धुउं नेदी :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. पुढे स्वामीं चारनेरकडे निघाले तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 436
  • Anwa : मार्गी देमाइसांकरवी जाडी ठेववणें :।।:
  • लखुबाइसीं देमाइसांतें गोसावियांजवळी आणिलें: गोसावियांतें गुरु करविलें: तियें सकंचनें: देमाइसें तियें निष्कंचनें: लखुबाइसें जेवीतिः देमाइसांकरवी वाटी धुववीतिः सातरी घालवीतिः गुरुत्वाचा उपकारू आणि काही झाडीपुसी करीतिः या दाटलेपणातवं देमाइसें लखुबाइसांते काही म्हणों न शकेतिः तें देखौनि गोसावी भक्ताचें संग पालटीतिः गावं वाटीतिः मग भक्तिजन भिक्षे जातिः भिक्षा करौनि येतिः गोसावियांसि दृष्टीपूता झोळी करीतिः मग गोसावी पाटासि जेउं पाठवीतिः एकु दी गोसावी मार्गी बिजें करीत असतिः तवं देमाइसाचिये डोइए लखुबाइसांची जाडी देखिलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘देमतीः हें जाडी कोणाची?’’ तवं देमाइसीं म्हणितलें: ‘‘जीः जीः हें लखुबाइसांचीः जै वर्तोनि गोसावी मज आणि लखुबाइसासि सांघातु लाविलाः तें वर्तौिन मजचिकरवी जाडी वाहावीत असतिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘हे ठेवाः तुम्ही चालाः’’ तवं मागिलीकडुनि लखुबाइसें आलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइ आपुली जाडी घेयाः तुमचा कडीवळु तो पुढां गेला असेः जाडी वाहावेना तरि एकु कडीवळु कां खडाना?’’ मग तिहीं आपुली जाडी घेतलीः तियें दिउनी आपुली जाडी देमाइसां वाहो नेदीति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. पुढे स्वामीं चारनेरकडे निघाले तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Anwa : विष्णुभटां भेटि :।।:
  • एकु दीं विष्णुभट गोसावियांचिया दरीसनां आलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: श्रीमूर्ति अवलोकीत पुढां बैसले :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात मासरुळ येथे १ मास वास्तव्यानंतर पिंपळगाव-भोकरदन-सिल्लोड-निल्लोड वरुन स्वामी आन्व्याला आले. स्वामींचे आन्व्याला २० दिवस वास्तव्य(अवस्थान) झाले. तेव्हाची ही लीळा…)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: