Antor (अंतोर)

अंतोर, ता. जि. अमरावती


येथील 2 स्थाने (गोविंदप्रभुबाबा) एकाच ठीकानी आहेत - ही स्थाने अंतोर गावांच्या मधोमध उंचावर/गढीवर मंदीरात आहेत.


जाण्याचा मार्ग :

पुजद्याहुन ईशान्येस अंतोर (शिराळा, ब्राह्मणवाडा भगत मार्गे) 9 कि, मी. आहे. वलगाव – चांदूरबाजार मार्गावरील शिराळा फाट्याहून (शिराळा ब्राह्मणवाडाभगत मार्गे) अंतोरला जाता येते. अंतोर ला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील दोनही स्थाने.

1. श्रीगोविंदप्रभूचे आसन स्थान :

हे स्थान अंतोर गावाच्या मध्यभागी पाण्याच्या टाकीजवळ गढीवर उत्तराभिमुख देवळात आहे. गोविंदप्रभूच्या वेळी येथे रणराखसा काइंदरण्याचा आवार होता. त्या आवारातील उत्तराभिमुख देव्हारचौकीच्या पटीशाळेवरील हे स्थान होय. देवळात प्रवेश केल्यावर आपणास दोन ओटे दिसतील. त्यापैकी पूर्व बाजूचे आसन स्थान होय.

लीळा : श्रीगोविंदप्रभू मातुळग्रामहुन अंतोऱ्याला आले. प्रथम त्यांना येथे आसन झाले. रणराखसा काइंदरण्याने श्रीप्रभूचे श्रीचरण प्रक्षाळण केले. गंधाक्षता लावल्या. (ऋ. प्र. ली 219)


2. पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून पश्चिमेस 5 फूट 10 इंच अंतरावर आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे रणराखसा काइंदरण्याच्या पूजा आरोगणेचा व बीवडीचा स्वीकार केला. (ऋ. प्र. 219, स्था. पो. उ. प्र.)
अंतोरा येथील तीन दिवसांच्या वास्तव्यानंतर श्रीगोविंदप्रभू काटसुऱ्याला गेले.


अनुपलब्ध स्थाने :

1. देव्हारचौकी अवस्थान स्थान

2. मादने स्थान,

3. परिश्रय स्थान,

4. ओहळी दांडी खालाविणे स्थान


अंतोन्याची एकूण स्थाने : 6


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: