Anjani Bk (अंजनी.बुद्रुख)

अंजनी (बुद्रुख), ता.मेहकर जि. बुलढाणा


येथील 1 स्थान - हे स्थान अंजनी गावातील शाळेजवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

अंजनी बु. हे गाव, मेहकर-मालेगाव मार्गावर मेहकरहून पूर्वेस 8 कि.मी. आहे व मालेगावहून नैर्ऋत्येस 37 कि.मी. आहे. अंजनीला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान अंजनी गावाच्या पूर्वेस घाटबोरी रस्त्यावर प्राथमिक मराठी शाळेच्या पूर्वेस पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात इसवीहून अंजनीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (ए. ली. 79 ख. प्र. स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून मेहेकरला गेले.

एका वासनेप्रमाणे गावाच्या पश्चिमेस असलेल्या लिंगाच्या पूर्वाभिमुख देवळात वसती झाली.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


वासनाभेदाचे स्थान : 1


अंजनीचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 90
  • Anjani : आंजनीये वसति :॥:
  • मग उदयाचा पूजावसर जालेयानंतरे गोसावी आंजनीयेसि बीजे केले : आंजनीयेसि गावांपश्चिमें लिंगाचे देउळ तयासि पूर्वामुख दारवंठा : चौकीं गोसावीयांसिं आसन जालेः पूजावसर आरोगणा : गुळुळा : विडा : पहूड जालाः उपहुड जालाः आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा ओळगविलाः वसति जाली :॥:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: