Anjangaon Bari (अंजनगाव बारी)

अंजनगाव (बारी) ता. जि. अमरावती


येथील 2 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) एकाच ठीकाणी आहेत-अंजनगांव(बारी) येथील 2 स्थाने अंजनगांव (बारी) गावाच्या पश्चिमेकडे मंदीरात आहेत.


जाण्याचा मार्ग :

अंजनगाव, अमरावतीहून किंचित आग्नेयेस 18 कि.मी आहे. आष्टी ते अंजनगाव (अमरावती मार्गे) 37 कि.मी. आहे. अंजनगावला जाण्यासाठी अमरावतीहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. भुसावळ-नागपूर लोहमार्गावरील बडनेरा व चांदूररेल्वेमधील टिमटाळा रेल्वेस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर अंजनगाव (बारी) आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील सर्व)

1. श्रीगोविंदप्रभूचे अवस्थान स्थान :

हे स्थान अंजनगावच्या नैर्ऋत्य विभागी उत्तराभिमुख देवळात आहे. गोविंदप्रभूच्या वेळी येथे बाह्मणाचा आवार होता.

लीळा : श्रीगोविंदप्रभू भानखेडीहुन अंजनगावला आले. त्यांचे या ठिकाणी 3 दिवस वास्तव्य होते. पूजा, आरोगणा, पहुड, उपहुड येथेच होत असे. (गो. प्र. च. 233, स्था. पो.)

अवस्थान स्थानापासून वायव्येस 3 फूट 8 इंच अंतरावरील मांडलिक स्थान आहे.


2. पटीशाळेवरील आसन स्थान :

हे स्थान मांडलिक स्थानापासून उत्तरेस 2 फूट 3 इंच अंतरावर आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू नांदगावहन अंजनगावला आल्यावर महाजनांनी विनंती करून त्यांना येथे आणले. या ठिकाणी श्रीप्रभूना आसन झाले. महाजनांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. टीळा लावला. विडा अर्पण केला. मग येथेच मर्दना झाली. नंतर अंगणी मादने झाले. (स्था. पो. उ. प्र.)
श्रीगोविंदप्रभू येथून अमरावतीला गेले.


देवळाच्या आवारात देवळासमोरील पायऱ्या उतरल्यावर पूर्व बाजूस उत्तराभिमुख खोलीत नमस्कारी चिरे मांडलेले आहेत.


अनुपलब्ध स्थाने :

1. अंगणातील मादने स्थान.

2. वेशीद्वारी महाजना भेटी स्थान.

3. लिंगाच्या देवळातील विहरण स्थान.

4. सिद्धनाथाच्या देवळातील विहरण स्थान.

5. तिसऱ्या लिंगाच्या देवळातील विहरण स्थान.

6. परिश्रय स्थान.


अंजनगाव ची एकूण स्थाने : 8


  • Govind Prabhu Charitra Lila – 233
  • Anjangaon Bari : आंजनगांवी अवस्थांन :॥
  • मग गोसावी आजनगांवासि बीजें केलें: आवघे गावांचे माहाजन साउमें आले : वेसीपुढे भेटि जाली : दंडवत घातले : श्रीचरणा लागले : मग गोसावियांतें वीनवीलें : दुर्गा-आंतु घेउनि गेले : देव्हारचौकोंय अवस्थान जाल : त्री रात्री : मग गोसावियासि पडदणीं वोळगवीली : मग मर्दन मादणे जालें : मग पुजा जाली : वस्त्र बोळगवीलें : मग आरोगणा केली: केळे: मांडे : साकर ऐसी आरोगणा जाली: मग गुळा बीडा बोळगवीला:॥ २३३ ॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: