Anjaneri (अंजनेरी)

अंजनेरी, ता. नाशिक जि. नाशिक


येथील 1 स्थान - अंजनेरी गावाच्या पूर्वेकडे 300 मीटर अंतरावर जैन मंदीर आहे. या मंदीरात स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

अंजनेरी हे गाव, नाशिक-त्र्यंबक मार्गावरील अंजनेरी फाट्यापासून दक्षिणेस एक कि.मी. आहे. नाशिक ते अंजनेरी फाटा 22 कि.मी, त्र्यंबक ते अंजनेरी फाटा 7 कि.मी. अंजनेरीला जाण्यासाठी नाशिक व त्र्यंबकहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे. येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. जवळच महानुभाव आश्रम आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान अंजनेरी गावाच्या पूर्वेस 300 मीटर अंतरावर पूर्वाभिमुख जैन मंदिरात आहे. चौक नमस्कारी आहे. आता येथे स्थानाला ओटा बांधण्यात आला आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात गोवर्धनहुन अंजनेरीला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. नंतर सर्वज्ञ येथून त्र्यंबकला गेले. (पू. ली. 249. स्था. पो.) व त्र्यंबकहून नाशिकला जाताना पुन्हा येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 256, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

विशेष : अंजनेरी पासून पूर्वेस 4 कि.मी. अंतरावर नाशिक-त्र्यंबक मार्गावर खंबाळे गावात रोडवरच मांडलिक मंदिर आहे. तिथे नमस्कारी माधान आहे. स्वामींनी जेव्हा त्र्यंबकेश्वराला विडा वाहला त्याआधी आपले हाथ त्या माधानात धुतले, म्हणून हे माधान नमस्कारी आहे.


अनुपलब्ध स्थान :

1. देवळाच्या दक्षिणेचे परिश्रय स्थान


अंजनेरीची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 249
  • Anjaner : अंजनेरिये वसति :॥:
  • गोसावी अंजनेरियेसि बीजे केले : बुधाचीये वसैचा पुर्वमुख देउळी आसन जालेंः बाइसीं श्रीचरण प्रक्षाळिलेंः पूजावसरु केलाः आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा जालाः पहुड जालाः वसैये वसति जाली :॥:
  • (..येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी यावेळी त्र्यंबकेश्वरवरुण आले असताना अंजनेरिला वसतिस थांबले.)
  • Purvardha Charitra Lila – 256
  • Anjaner : अंजनेरिये बुधाची वसैये वसति :॥:
  • (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे :॥: ..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी वेरुळ-सिन्नर-नासिक वरुण आले व त्र्यंबकेश्वरकडे निघले असताना थांबले.)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: