Amravati Sthan (अमरावती स्थान)

अमरावती, ता.जि. अमरावती


अमरावती येथील महाजनपूर्यातील माताखिडकी मन्दीरात श्रीकृष्ण अवताराने ऋक्मिनीहरणाचे वेळी मुक्काम केला असे या स्थानाचे बाबत काहींचे मत आहे. माताखिडकी मंदिर भव्य बांधकाम झालेले आहे.


जाण्याचा मार्ग :

नागपूर ते अमरावती 153 कि.मी. अकोला ते अमरावती 101 कि.मी. नागपूर-वर्धा-अकोला रेल्वे मार्गाने जाऊन बडनेरा रेल्वे स्थानकावर उतरून अमरावती जाता येते. बडनेरा ते अमरावती 9 कि.मी.


स्थानाची माहिती :

1, 2. माता खिडकी स्थान :

अमरावती शहरातील महाजनपुरा (माता खिडकी) विभागातील स्थाने श्रीकृष्ण अवताराची आहेत. असे परंपरेने बोलले जाते.

श्रीकृष्ण अवताराने रुक्मिणी हरण च्या वेळी मुक्काम केला असे या स्थानाचे बाबत काहींचे मत आहे. माताखिडकी मंदिर भव्य बांधकाम झालेले आहे. लेखी पुरावा उपलब्ध नाही.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अमरावती चे स्थान : 2


  • Purvardha Charitra Lila –
  • Amravati : रथावरि पतन :।।: / रथावरि देवां भक्तां भेटि
  • अनुवादु महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः रूक्मिणीआउसें माडावरूनि झेप घालीतिः तरि काइ होतें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तरि रथावरि पडतिः देवां भक्तां भेटि होतिः सुदेवें ब्राम्हणें धरिलें: वारिलें: म्हणौनि तितुका काळु विलयो लागलाः तेतुकें अंतर पडिलें: एर्‍हवी तेव्हेळीसीचि देवाभक्ता भेटि होतिः’’ :।।:
  • (टिप:‌- श्रीकृष्णचरित्रातील लीळा आमच्या स्वामींनि महादाइसा इत्यादी भक्तांनी विचारल्यावरुन प्रसंगानुरुप कथन केल्यात. Website वरुन ‘लीळेचे वाचन होने’ एवढाच उद्देश येथे असल्यामुळे, तसेच या लीळांची ठीकाने निश्चीत नसल्यामुळे या लीळा शक्यतोवर त्या त्या गावाच्या नावाने Upload करण्याचा प्रयत्न करन्यात येत आहेत. तरीही काही चुका होन्याची श्यकता नाकारता येत नाही. चुक आढळल्यास व वाचकांनी तसे आम्हाला संदर्भासह कळवल्यास दुरुस्ती करण्यात येइल…
  • Purvardha Charitra Lila –
  • Amravati : रूक्मिणी अवस्था श्रवण :।।: / रूक्मिणी अवस्थाश्रवणें श्रीकृष्ण निर्गमणानुवादु :।।:
  • एकु दीं महादाइसें पूराण आइकौनि आलीः मग महादाइसीं पुसिलें: ‘‘जी जीः श्रीकृष्णचक्रवर्ति कौंडणपूरां एकलेयां कां बिजें केलें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘द्वारकेहूनि नागारी कौंडणपूरासी आलेः तेहीं श्रीकृष्णचक्रवर्ति वाखाणिलेः आणि रूक्मिणीदेवीसि अवस्था लागलीः अवस्थेसरिसा सुदेव ब्राम्हणु मूळ पाठविलाः बाइः सुदेवो द्वारकेसि आलाः श्रीकृष्णचक्रवर्ति सुदेवातें पुसिलें: ‘तुम्हीं निगालेति तेव्हेळी रूक्मिणदेवीसि कैसी अवस्था?’ सुदेवें म्हणितलें: ‘जी जीः मी निगाला तेव्हेळी मज विडा दिधलाः तियें हातीची पानें सुकलीः करपलीः जी जीः दुसरा विडा दिधलाः तवं तेहीं सुकलीः मग रागे हडपिणीसि कोपलीः ‘हां गेः पानें पळवा कां गे केली?’ तिया म्हणितलें: ‘आइः तुमचीये हातीचेनि जाळें पानें करपतयातिः’ तेव्हेळी कापूरें विडा देवों आदरिलाः तवं तेणें हातीं जाळु निगालाः मग लेणीं लुगडी देउनि मातें पाठविले जीः’ तेव्हेळी श्रीकृष्णचक्रवर्ति म्हणितलें: ‘तरि रूक्मिणीदेवीसि दाहावी अवस्था वर्तति असेः आतां वेळ लाउचि नेः लाविजैल तरि रूख्मिणी देह त्यजिलः’ म्हणौनि श्रीकृष्णचक्रवर्ति एकलेयां बीजें केलें: दीढे दिसें देवो वैदर्र्भेिस आलें:’’ :।।:
  • (टिप:‌- श्रीकृष्णचरित्रातील लीळा आमच्या स्वामींनि महादाइसा इत्यादी भक्तांनी विचारल्यावरुन प्रसंगानुरुप कथन केल्यात. Website वरुन ‘लीळेचे वाचन होने’ एवढाच उद्देश येथे असल्यामुळे, तसेच या लीळांची ठीकाने निश्चीत नसल्यामुळे या लीळा शक्यतोवर त्या त्या गावाच्या नावाने Upload करण्याचा प्रयत्न करन्यात येत आहेत. तरीही काही चुका होन्याची श्यकता नाकारता येत नाही. चुक आढळल्यास व वाचकांनी तसे आम्हाला संदर्भासह कळवल्यास दुरुस्ती करण्यात येइल…



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: