Akhatwada (आखतवाडा)

आखतवाडा ता. मोर्शी जि. अमरावती


आखतवाडा येथील येथील 8 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) - 2 ठिकाणी आहेत. गावात व गावाबाहेर.
5 स्थाने गावातच पश्चिमेकडे एकाच ठीकाणी आहेत.
गावाबाहेरील 3 स्थाने गावाच्या नैऋत्येकडील भागात महादेव मंदीर परिसरात जवळ जवळच आहेत.


जाण्याचा मार्ग :

आखतवाडा हे गाव, परतवाडा-तिवसा मार्गावरील नेर (पिंगळाई) गावापासून दीड कि. मी. आहे. काटपूर ते नेर 8 कि. मी. लेहेगाव ते नेर 4 कि. मी. तिवसा ते नेर 21 कि. मी. काटपूर ते आखतवाडा पायमार्गे 8 कि. मी. नेरपर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.
आखतवाडा येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

गावातील स्थाने

1. वसती स्थान :

हे स्थान आखतवाडा गावाच्या पश्चिम विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. श्रीप्रभूच्या वेळी येथे भोप्याचा आवार होता.

लीळा : श्रीगोविंदप्रभू नमस्कारीहुन आखतवाड्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुसऱ्या दिवशी ते येथून शिरखेड ला गेले. (गो. प्र. च. 243, स्था, पो.) 


2. पूजा आरोगणा स्थान :

हे स्थान वसती स्थानापासून पूर्वेस ४ फूट ७ इंच अंतरावर आहे.

लीळा : येथे श्रीप्रभूनां पूजा आरोगणा झाली. (गो.प्र.च. 243, स्था.पो.)


3. मर्दना स्थान :

हे स्थान आरोगणा स्थानापासून आग्नेयेस 5 फूट अंतरावर आहे.(स्था.पो.) 


4. मादने स्थान :

हे स्थान मर्दना स्थानापासून पूर्वेस 2 फूट अंतरावर आहे. (स्था. पो.) 


5. श्रीचरण प्रक्षाळणे स्थान :

हे स्थान मादने स्थानापासून उत्तरेस 9 फूट अंतरावर आहे. 

लीळा : कळंकेश्वराच्या देवळातून भोप्याने श्रीप्रभूना आपल्या आवारी आणले. प्रथम त्यांना येथे बाजसुपवतीवर आसन झाले. मग भोप्याने त्यांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (गो. प्र. च. 243) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील पाचही स्थान


गावाबाहेरील स्थाने

6. कळंकेश्वरी चौकी आसन स्थान :

हे स्थान आखतवाडा गावाच्या नैर्ऋत्येस 600 मिटर अंतरावर नेरपिंगळाईच्या हद्दीत धवळी नदीच्या पलिकडे श्री. जगन्नाथराव देशमुख यांच्या संत्र्याच्या बगीचामध्ये उत्तराभिमुख देवळात आहे.


लीळा : श्रीगोविंदप्रभू नमस्कारीहुन प्रथम येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. त्यावेळी गावातून एक भोपी आला. त्याने श्रीप्रभूना विनंती करून आखतवाडा गावात आपल्या घरी नेले. (गो.प्र.च. 243. स्था.पो.)


नमस्कारी लिंग : हे लिंग देवळाच्या पूर्व बाजूस आहे.


लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी कळंकेश्वराच्या लिंगाशी खेळ केला. (भी. प्र. ली. २२४, ऋ.प्र.ली. २३४, ना. प्र. उ. ली. ७८)

नमस्कारी नंदी : हा नंदी देवळाच्या पश्चिम बाजूस आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी या नंदीशी खेळ केला. (स्था.पो.द.मा.शा.प्र.)


7,8. कन्हे अवलोकन स्थाने :

ही दोन स्थाने देवळापासून वायव्येस 34 फूट अंतरावर आहेत.

लीळा : या ठिकाणी पाषाणाच्या घागरी होत्या. त्या श्रीगोविंदप्रभूनी येथे येऊन दृष्टीने अवलोकन केल्या. (भी. प्र.ली. 224, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील तीनही स्थान


आखतवाड्याची एकूण स्थाने : 8


  • Govind Prabhu Charitra Lila – 243
  • Akhatwada : आखतवाडां वसति :॥
  • आखतवाडां वसति:॥ ठाकुरा घरी पुजा आरोगणा : मग गोसांनी आखतवाडेयासि चीजें केलें : कळंकेश्वरी दांडी खालविली : मग चौकी आसन जालें : तवं गावातुनि ठाकुर ( ब्राह्मणु ) एकु आला : तेणें गोसांवियांसि दंडवत घातले : श्रीचरणा लागला : मग गोसांवियांतें वीनवील : ” जी जी ! माझेया घरासि बीजें करावें जी !” गोसावीं वीनवणी स्वीकरीली : मग बीजें केलें : एकीकडे दांडीगचा कोंबु तेणे खादी घेतला : मग घरासि घेउनि गेला : मग बाजे सुपवती वरि आसन केलें : मग श्रीचरण प्रक्षाळीलें : मग पडदणी दीधली : मग मर्दना मादणें जालें : वस्त्रे वोळगवीली : तीयें वेदीली : मग गोसावी आसनी उपवीष्ट जाले : मग टीळा केला : अक्षेता लावीलीया : मग पुजा केली : आरोगणा जाली : मग गुळुळा वीडा जाला : मग पहुड जाला : मग उदेयाचि बीज केलें ॥२४३॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: