Agarwadgaon (आगरवडगाव)

आगरवाडगाव / वाडेगाव जुने, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद.


येथील 3 स्थान जुने आगरवाडगावच्या (आज वोस असलेले) दक्षिणेस आहेत.

सदर स्थानांवर जाण्याकरीता विशिष्ठ रस्ते असे नाहीत. कारण ही स्थाने पैठणच्या नाथसागराच्या बुडीत क्षेत्रात येतात. खरे तर येथे पूर्वी मंदीरे होती, काही आजही उपलब्ध आहेत. मात्र स्थानांवर जानारे रस्ते फक्त पाउस ज्या वर्षी कमी होइल त्या वर्षी मोठी गाडी, बैलगाडी, पायदळ, व लहान अवैधरित्या मासेमारी करणार्या लहान नावेतुन अवैधपणे जावे लागते... किंवा ...

असे असले तरी बरीच मंडळी येथे जातात. त्यासाठी MahanubhavDarshan.Com द्वारे सदर स्थानांवर जाण्याकरीता Nevigation द्वारे विशिष्ठ स्थान GoogleMaps वर निर्देशीत करण्यात आले आहे. गरजुंनी त्याचा उपयोग अवश्य करावा.... किंवा ... त्यासाठी नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान या पेजवर भेट द्यावी...

इ.श्री योगेंद्रदादा शेवलीकर,M.A. M.Phil. जाळीचा देव यांच्या मो.क्र. 7385901015 वा 8605275481 यावरुन जान्याचे रस्ते समजुन घ्यावे. योगेंद्रदादा यांनी त्या त्या गावात विशिष्ठ ओळखी करुण तेथील संपर्क क्रमांक मिळवलेले आहेत.)


जाण्याचा मार्ग :

औरंगाबाद-नगर राज्यमार्गावर, औरंगाबाद-प्रवरासंगम दरम्यान भेंडाळा गाव आहे. तेथून नवे गळनिंब, आगरवाडगाव नवे येथे जावे. तेथून धनगरपट्टी वस्ती येथे जावे. तेथून जुने आगरवडगाव 3 कि.मी. आहे. जुने गळनिंब ते धनगरपटटी वस्ती 9 कि.मी. आहे.


स्थानाची माहिती :

हे गाव नाथसागरात बुडाले असून नवीन वाडगावचे पुनर्वसन झाले आहे; पण आपले स्थान जुन्या गावी नदीच्या तीरी आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरी देवतेच्या मंदिराचे धाबे होते; म्हणून या स्थानाला परिसरातील लोक ‘धाब्याचा देव’ असे म्हणतात.

शब्दार्थ : धाबा म्हणजे लाकडी जोडणीच्या माळवदावर मातीच्या पेंडाचे अच्छादन. “वाडेगावी नृसींह मढी पटीशाळा सोंडीएवरी आसन…” येथे अनेराज व्यासांना स्वामींनी वरदान दिले. हा उल्लेख आहे. (उ. ली. च. माळवे संग्रहालय, पुसद)

1.जोगेश्वरीचां धांबा आसन स्थान :

हे स्थान जुने आगरवाडगावच्या (आज वोस असलेले) दक्षिणेस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे जोगेश्वरीचे धावे होते. येथून सर्वज्ञ वरखेडला गेले.

लीळा : ‘वाडेगावी धाबा आसन हिंसे निमित्ये गमन’ सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी त्यांच्या उत्तरार्ध परिभ्रमण काळात सुरेगावाहूनआगर वडगावला आले. तेव्हा त्यांना जोगेश्वरीच्या सभामंडपात आसन होते. याच ठिकाणी त्यांना मुक्काम करायचा होता पण तेथे एक जण देवतेला बळी देण्यासाठी मेंढरू घेऊन आला. तेव्हा बाईसा म्हणाल्या, “जा परती तेथे बाबा असती.” तेव्हा सर्वज्ञ म्हणाले, “बाई हे घेईन घेईन म्हणत असे: हा देईन देईन म्हणत असे: तरी एथौनी चाला:” तेथून स्वामींनी गमन केले. हिंसा होते तेथे महात्म्याने राहू नये हा आचारधर्म स्वामींनी शिकवला. राजस, तामस ठिकाणी बसू नये. ज्या व्यक्तीच्या किंवा ठिकाणाच्या योगे राजस-तामस उल्लेख उत्पन्न होतात त्यांचा त्याग करावा. तेथून स्वामी नृसिंहाच्या देवळात आले. वसती झाली.

(उ. ली. 316, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. नरसिंहाच्या देउळातीलवसती स्थान :

हे स्थान आसन स्थानाच्या दक्षिणेस आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे नरसिंहाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
लीळा : जोगेश्वरीच्या धाब्यामधून हिंसा निमित्ते प्रस्थान केल्यावर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे आले. त्यांचा या ठिकाणी एक रात्र मुक्काम झाला. (उ. ली. 316 स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. परिश्रय स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या आग्नेयेस आहे. (स्था. पो.) हे स्थान वसती स्थानाच्या आग्नेयेस आहे. पण हे स्थान गाळात फसलेले असून त्याचे संशोधन कार्य चालू आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थान :

1) नरसिंहाच्या पटीशाळेवरील आसन स्थान.

2) मेंढ खडकी आसन स्थान.

मेंढखडक हा आगारवाडगावच्या हद्दीत असून हल्ली तो पाण्यात आहे. वस्तीस्थानापासून अंदाजे २०० ते २५० मिटर अंतरावर असावा.


विद्यापीठ स्थानपोथी: मेंढखडकी आसनः वाडेगावी जोगेस्वरीचा धाबा आसनः।। एकी वासना संवंजडीखाली जखीणिचे धाबे ॥ नरसींहंमढी वस्ति ।। नरसींहमढ जागेस्वरी दक्षीणे पांडा २०|| नरसिंह मढु पूर्वामूख दक्षीणे परीश्रएः वाडेगावीची स्थाने ४ ।।

विद्यापीठ स्थानपोथी: मेंढखडकी आसनः गावा उतरता उत्तर विभागी उंच खडकः।। इंद्रभटा करवी पासवडी तुणवणेः वाडेगावी नृसिंहमढी वस्तीः मठु गावा दक्षिणे पुर्वाभिमुखः उंबरवटुः ।।: दक्षीणे परीश्रयः ।। हे रामेश्वरबासः।। परशरामबासः वासती नाही: मेंढ खडकीहुनी धाबा आसनः घटसिद्धनाथः।। नृसिंह मढा उत्तरे पांडा वीसा जखीनीचे धावे पूर्वाभिमुखः तेथ आसनः।। पशु उपद्रवी निर्गमनः।। वाडेगावी स्थानेः५ः


आगरवाडगावची एकूण स्थाने : 5


  • Purvardha Charitra Lila –
  • Agarwadagaon : गावांतु नृसिंहमढीं वस्तिः ब्राम्हणाचा उपहारू :।।:
  • गोसावी वाडेगावांतु बिजें केलें: तेथ जोगेस्वरीसि दक्षिणे नृसिंहाचा मढीं वस्ति जालीः ब्राम्हणें एकें उपहारू आणिलाः गोसावियांसि आरोगणा जाली :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पेहरासंगम-गळनिंबा-कोळेस्वर(गळनिंब) असा मार्ग क्रमण करित आगरवडगाव येथे आले. स्वामींना येथे वस्ति(एक रात्र वास्तव्य) झाली…)
  • Purvardha Charitra Lila –
  • Agarwadagaon : वाडेगावीं धाबां आसनः हींसानीमित्ये गमन/पशूउपद्रव्यीं निर्गमन :।।:
  • गोसावी मेंडखडकौनि वाडेगावां बिजें केलें: तेथ गावांदक्षिणे नैरूत्य कोना आश्राइत गंगेचीए थडिएः सविंजडी जखिणी असेः तेथ धाबां बाइसीं आसन घातलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: तवं एकु देवतेसि मेंढरूं घेउनि आलाः हातीं खांडेः काढिलेनि शस्त्रें उभें केलें: गोसावी आसनिहुनि उठिलेः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः बैसिजे ना कां?’’ तें जाणौनि बाइसीं तयातें म्हणितलें: ‘‘जाए परतें: एथ बाबा असतिः एथ ऐसें काइ करूं आलासिः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हा म्हणतु असेः ‘केधवां: केधवां मारीनः’ हें म्हणत असेः ‘केधवाकेधवा खाइनः’ बाइः हें ‘घेइन घेइन’ म्हणताएः हा ‘देइन देइन’ म्हणताएः एथौनि चालाः बाइः घेया मात्रः एथौनि निगावेचि लागेलः’’ मग बाइसीं मात्रा घेतलीः निगतां सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘राजसे तामसे स्थानी नसावेः हिंसा वर्ते तियें स्थानीं महात्मेया असो नयेः’’ म्हणौनि तेथौनि बिजें केलें :।।:
  • (टिप – उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पेहरासंगम-गळनिंबा-कोळेस्वर(गळनिंब) असा मार्ग क्रमण करित आगरवडगाव येथे आले. स्वामींचे येथे आसन झाले….)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: