Agar Nandur (आगर नांदूर)

, ता. गेवराई, जि. बीड.

जाण्याचा मार्ग :

स्थानाची माहिती :

1. स्थान :

१)आदित्याच्या देउळातील अवस्थान
२)आदित्याच्या देउळातील मादने स्थान
३)एकविरेच्या देउळातील आसन स्थान
४)म्हाळसेच्या देउळातील आसन स्थान
५)पिवळदरडीतील आसन स्थान
६)पिवळदरडीतील परिश्रय स्थान
७)पिवळदरडीतील लघुपरिश्रय स्थान
८)नंदेश्वराच्या देउळातील आसन स्थान
९)नंदेश्वराच्या देउळातील आंगनी दादेया भेटी स्थान
१०)घाटातील आसन स्थान
११)पिवळदरडी विहरणा बिजे करणे स्थान

Google Map Location Link 👈 (किल्क करा)

चे स्थान : 1

  • Purvardha Charitra Lila – 516
  • Agar Nandur : नांदौरीं आदित्यी अवस्थान :।।:
  • गोसावी नांदौरासि बिजें केलें: काळीदासभट उदेयाचि गोसावियांचिया दरीसनां आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: पासी बैसलेः मग सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘पीवळदरडीयेसी मांडौ घाला गाः’’ म्हणोनि काळीदासभटाकरवी पीवळदरडी मांडौ घालविलाः मग गोसावी तेथ बिजें केलें: तेथ विहरणा बीजें करीतिः एकाधा दी गावादक्षिणे एकवीरेचे देऊळ तेथ विहरणा बिजें करीतिः एकाधा दी गंगेचिये थडी नंदेस्वराचे देउळ तेथ विहरणा बिजें करीतिः एकाधा दी म्हाळसेचेया देउळा विहरणा बिजें करीतिः तेथ आसन होएः गुळळा होएः विडा होएः गोसावियांसी तेथ आदित्यी अवस्थान जालें: दिस पंधरा :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 517
  • Agar Nandur : सामको पुत्रत्वस्वीकारें आरोगण :।।:
  • सामकोसांचा पुत्रु सरला होताः तो तयांसि करंजाळां रात्रीं स्वप्नी आलाः तेणें म्हणितलें: ‘‘आइः मज जेउं सुये कां: थोर भूक लागलीः’’ तिहीं म्हणितलें: ‘‘काइ जेउं सायें रे बा?’’ तेणें म्हणितलें: ‘‘नाः दधिभात जेउ सुयेः’’ मग तें साडेगावां आबैसांसि भेटावया आलीं: आबैसांपुढें सांघितलें: आबैसीं म्हणितलें: ‘‘गोसावियांसि आरोगणा देः’’ इतुकेनि दोघी गोसावियांजवळी नांदौरा आलीयाः उपहार आणिलाः गोसावी विहरणीहूनि बिजें केलें: भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलीः गोसावियांपुढां स्वप्नु सांघितलाः ‘‘जी जीः स्वप्न देखिलाः’’ ऐसें अवघें सांघितलें: मग आरोगणेंलागी विनविलें: ‘‘जी जीः तरि मीं गोसावियांसि आरोगण देइनः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तरि काइ तुमचीयां पुत्रां होआवे?’’ तिहीं म्हणितलें: ‘‘हें काइ जी? ऐसें कैसें?’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘कांपां: हें नव्हें तुम्हीं म्हणतु असाः तुमचेनि पुत्रें तुमतें स्वप्नीं जेउं मागितलें: तुम्हीं यांसि जेउं सुत असाः तरि हें तुमचें पुत्र होइल कीः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जीः हें अवघे जग विश्व गोसावीयांपासौनिः मां गोसावी कोणाचें पुत्र होति जी?’’ गोसावी मानिलें: तेही दधिभातपूर्वक उपहार निफजवुनी आणिला होताः तांदुळाचां भातः दहीवडेः मांडेः घारियाः पुरीयाः क्षीरीः साखरीः तूपः साकवतियाः ऐसें अवघे बाइसांचा हातीं दिधलें: मग बाइसीं गोसावियांसि दुपाहारचा पूजावसर केलाः ताट केलें: भक्तिजना ठाय केलेः भक्तिजन अनुक्रमें आपुलाला ठाइं बैसलेः सामकोसीं दंडवतें घातलीं: दधिभात उन्हें तापला आलाः तें ओळगवीतीचिनाः आरोगणा करितां गोसावी पुसिलें: ‘‘हें काइ?’’ सामकोसीं म्हणितलें: ‘‘जी जीः हा दधिभातः उन्हें तापला तो कीं नासला जीः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः आणाः’’ तिहीं वाढिलाः गोसावी प्रसादु केलाः गोसावियांसि भक्तिजनासहित आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा ओळगवीलाः ऐसें गोसावी पुत्रत्व अंगिकरिलें: मग तेहीं एरी दिसीं स्वप्न देखिलें: ‘‘आइः मीं आजी थोर धालों: निवालों: आजीलागौनि न मागें होः’’ तें येउनि गोसावियांपुढां सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः तो प्रतिदेहापासौनि मुंचविलाः आणि सुखफळासि नेलाः’’ मग तिया ‘‘जीजीः’’ म्हणौनि श्रीचरण धरिलें: दंडवतें केलीं: श्रीचरणां लागलीं: गोसावीं तयासि पाठवणी दिधलीः मग गोसावियांसि पहूड जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 518
  • Agar Nandur : राणाइपीते उपहारूस्वीकारू :।।: / राणाइ पीतेयाचा दधिभात आरोगणा :।।:
  • गोसावियांसि पीवळदरडीये आसन असेः राणाइसें आणि राणाइसांचे पीतेः दादोबा गोसावियांचिया दरीसनां आलेः उपहार आणिलाः भेटि जालीः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: गोसावियांतें आरोगणेलागी विनविलें: ‘‘जीः मीं दधिभाताची आरोगणा देइनः’’ गोसावीं मानिलें: मग गोसावी बिढारा बिजें केलें: गोसावियांसि दुपाहाराचां पूजावसर जालाः बाइसीं ताट केलें: दधिभात वाढिलाः भक्तिजना ठाय केलेः आपण भिक्षान्न घेउनि पंक्ती बैसलीं: तें गोसावी अवलोकिलें: मग गोसावी पुसिलें: ‘‘बाइः हें पैल काइ झांकिलें असें?’’ तिया म्हणितलें: ‘‘जी जीः हें भिक्षान्न मियां आपणेयांलागी आणिलें:’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘आणा आरूतें:’’ तिहीं गोसावियांचां ताटीं ओळगवीलें: मग गोसावी अवघेयांचीए ठाइं वाढविलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें भिक्षान्न कीं: हें पवित्राचें पवित्र कीं: एथौनि याची थोरी जरि सांघिजैल तरि क्षोभालः हें दुर्लभाचें दुर्लभ कीं: या भिक्षान्नांतु सवाए पळ अमृत श्रवेः’’ मग भक्तिजनासहित गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा विडा जाला :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 519
  • Agar Nandur : काळीदासभटां स्तीतिः सुषुम्नामुखीं वासु निषेदु :।।: / काळीदासभटां मध्यमोद्घाट निक्षेदु :।।:
  • एकु दीं उदेयाचि काळीदासभट गोसावियांचिया दरीसना आलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: पुढां बैसलें: गोसावी कृपादृष्टी अवलोकिलें: आणि स्तीति जालीः तैसेचि पीवळदरडीयेसि जाऊनी स्तीति भोगीतु निवांत बैसले असतिः तेथ गोसावी बिजें केलें: आसन जालें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइं भटोः बैसले असाः कव्हणी ठाइं असा?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी जीः मध्यमोद्घाटी तपतटाकी असोः त्रिकुटस्थानीः सुखमनेचां मुखीं असोः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘सुषुम्नामुखीची कार्ये तियें काइ ऐसीं? तेथची कार्ये काइ ऐसीं ऐसीं वर्तति?’’ तेहीं म्हणितलें: ‘‘जी तियें कैसीं?’’ गोसावी तेथीचें भेद सांघितलें: सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘मध्यमेचा घाटुः सुषुम्नेचें मुखः त्रिकुटस्थानः तें काइ ऐसें? तेथ रोग नसैतिः ज्वरवार्तिक नाहीः तेथ क्षुधापीपासाः मलमूत्रः शीतोष्णः भयनिद्रा ये देहद्वंदें नाहीतिः तयां जरामृत्यु नाहीं: वळीतपळीती नाहीं: छायाकाया नाहीं: छेदभेद नाहीं: मध्यमेचां घाटुः सुषुम्नेचें मुखः त्रिकुटस्थान तें ऐसें कीं:’’ तिहीं म्हणितलें: ‘‘जी जीः तें काही देखिजेनाः’’ सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘तरि कैसें असा सुषुम्नेचां मुखीं? मध्यमोद्घाटी तपतटाकी? त्रिकुटस्थानी?’’ तैसीचि स्तीति भंगलीः नावेक बैसले होतेः मग उठिलेः दंडवतें घातलीं: श्रीचरणां लागलें: गेलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 520
  • Agar Nandur : तथा(काळीदासभटां) पैशून्यें स्थित्याधिक्य करणें :।।:
  • एक दिसु काळीदासभट गोसावियांचिया दरीसनां आलेः गोसावियांपांसिं पालखती घालौनि बैसलें: तयाचि कन्या धाकुटी होतीः तें हातरितीः तिये बाइसासि काही म्हणिये व्यापारू करूं लागतिः बाइसीं म्हणितलें: ‘बाबाः हें बटिकी कैसी निकीः बाबाचें सेवादास्य करावेया उपयोगा जाइल ऐसीः’’ मग बाइसी तियेतें म्हणितलें: ‘‘बटिकीः तू आणि मीं बाबापासी असों: बाबांचे सेवादास्य करूं: बाबा निकेः आणि बाबापासौनि तुज काही गोमटे होइलः’’ मग तेही घरां जाउनी रात्रीं पितेयापुढां सांघितलेः तेहीं म्हणितलें: ‘‘हो वो आणि काइः मां महात्मेयातें ऐसेचिः कां म्हणतिना? कां राहावीति ना? देखिलीसि गोरींगोमटीः धारेधाकुटी आणि काइ? कां म्हणतिनाः’’ तियां म्हणितलें: ‘बाबाः ऐसें काइ बोलतायेसीः’’ तेहीं म्हणितलें: ‘‘हो होः या महात्मेयाचें काइः आणिकातें राहा म्हणतिनाः ऐसेचिः तू वरूषा सोळाची आणि गोसावी वरूषा पंचविसाचेः तूज गोसावियांपासुनि कां गोमटे नव्हेः’’ ऐसें पैशून्य बोलु लागलें: आणि तेया शाक्तेयाचि स्तीति जालीः मग मागुतें पुसतिः ‘‘पां पां बटुकी बाइसे काइ म्हणति?’’ आणि तियें सांगति आणि तें तैसेचि म्हणतिः ऐसें तें जवं जवं पैशून्य बोलति तवं तवं स्तीति होएः सुखचि होएः ऐसीं स्तीति केतुला एक काळ भोगिलीः मग भंगलीः उदेयांचि गोसावियांसि दंतधावन गुळळा होत असेः जवळीके इंद्रभट असतिः तें कै आले तें नेणिजेः तवं काळीदासभट गोसावियांचिया दरीसना आलेः दंडवतें घातलीः श्रीचरणां लागलें: पालखती घालुनि पुढां बैसलेः आणि इंद्रभटांपुढां सांघो लागलेः ‘‘भटोः आमचे गोसावी साक्षात श्रीक्रष्णचक्रवर्तिः आरोधतां मुक्ति कां विरोधितां मुक्तिः काइ इंद्रभटोः द्वापरीं श्रीक्रष्णचक्रवर्ति आरोधलेयां मुक्ति देति कां विरोधिलेयां मुक्ति देतिः तैसेचि आमचे गोसावी आरोधलेयां मुक्ति देति आणि विरोधिलेयां मुक्ति देतिः’’ इंद्रभटीं गोसावियांपुढें सांघितलें: गोसावी उगेचि होतेः गोसावियांसि उदेयाचा पूजावसर जालाः तो पाहिलाः मग गोसावी तयासि पाठवणी दिधलीः तें दंडवतें करौनि निगालेः तेचि स्तीति मार्गी जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)
  • Purvardha Charitra Lila – 521
  • Agar Nandur : नंदेस्वरीं दादेया/ब्राम्हणां भेटि :।।:
  • एकु दीं गोसावियांसि उदेयाचा पूजांवसर जालेयानंतरे गोसावी नंदेस्वराचेया देउळा विहरणा बिजें केलें: तवं दादोबा तेथ निंबातळीं रांगवळीया भरीत होताः गोसावी तेथ बीजें केलें: तेयाचीए पाठीवरि श्रीकरू दिधलाः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘काइ दादेया? रांगवळीया भरीत असा?’’ आणि तेंही वरूति वास पाहिलीः तवं गोसावियांतें देखिलें: तेही ‘‘जी जीः’’ म्हणौनि दोन्हीं हात श्रीचरणांवरि ठेविलेः श्रीचरणां नमस्कार केलाः उठौनि दंडवत घातलेः गोसावीयांसि चौकी नावेक आसन जालें: गुळळा विडा जालाः तैलागुनि तयाचेनि हातें स्यारेज्वरू जाति :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने…. स्वामीं आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात पूरीं(पांढरी) जवळील पापविनासनीला ३ दिवस वास्तव्य(अवस्थान) होते. तेथुन स्वामी संगमजळगावला आले. स्वामींचे संगमजळगावला ५ रात्र वास्तव्य(अवस्थान)होते. तेथुन स्वामी नंदापूर(नांदौर)ला आले. येथे स्वामींचे १५ दिवस वास्तव्य(अवस्थान)होते तेव्हाची ही लीळा…)

या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: