Aavhane BK (आव्हाने बु.)

आव्हाणे बु. ता, शेवगाव, जि. अहमदनगर


येथील स्थान आह्वाने बु. गावाच्या दक्षिणेकडे गांवाजवळच मंदीरात हे 1 स्थान आहे.


जाण्याचा मार्ग :

आव्हाणे बु. हे गाव, पाथर्डी शेवगाव मार्गावरील अमरापूर गावापासून पश्चिमेस 5 कि. मी. आहे. त्याचप्रमाणे शेवगाव पांढरीचा पूल या मार्गावरील मळेगावपासून दक्षिणेस व ढोरजळगावपासून पूर्वेस 5 कि. मी. आहे. पाथर्डी ते अमरापूर 10 कि. मी. शेवगाव ते ढोरजळगाव 15 कि. मी, पांढरीचा पूल ते ढोरजळगाव 28 कि. मी. आव्हाणे बु. हे गाव येळीहून वायव्येस निपाणी जळगाव, पागोरी पिंपळगाव, अमरापूर मार्गे 23 कि, मी. आहे. हा मार्ग पायी जाण्यासाठी व जीपसाठी आहे. येळी ते आव्हाणे बु. (पाथर्डीमागे) 35 कि. मी. आहे आव्हाणे बु. येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान आव्हाणे गावाच्या दक्षिणेस गावालगतच नदीच्या उत्तर काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात दोन वेळा आव्हाणे येथे आले. पहिल्या वेळेस ते वांबोरीहून आले व दुसऱ्या वेळेस येळीहून आले. दोन्हीही वेळेस त्यांचे या ठिकाणी एक-एक रात्र वास्तव्य होते. पहिल्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून देवळाण्याला गेले व दुसऱ्या वेळेच्या एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून भोकरला गेले. (उ.ली.292, स्था.पो.उ.ली.448 ख प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


आव्हाण्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: