Aalegaon (आलेगांव)

आलेगाव, ता. पातूर जि. अकोला


येथील 3 स्थाने एकाच परिसरात आहेत - आलेगांव येथील 2 स्थाने गावाच्या दक्षिनेकडे वेशीजवळ निर्गुणा नदीच्या काठावरील मंदीरात आहेत. व 1 स्थान निर्गुणा नदीच्या पात्रात वरील स्थानांच्या थोड्या अंतरावर आहेत (वरील मंदीरातून चावी घेऊन जावे लागते).


जाण्याचा मार्ग :

घटाळीहून ईशान्येस आलेगाव पायमार्गे (नवागाव मार्गे) 10 कि. मी. आहे. पातूर-बाळापूर मार्गावरील बाभूळगावपासून आलेगावला जाण्यास मार्ग आहे. बाभूळगाव ते आलेगाव 13 कि.मी. पातूर ते आलेगाव (बाभूळगावमार्गे) 22 कि. मी. राजगढ ते आलेगाव (नवागाव मार्गे) 18 कि.मी. आलेगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे. एस.टी. बस स्थानकाच्या पाठीमागे श्रीकृष्ण आश्रम आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान आलेगावच्या दक्षिण विभागी जुन्या वेशीजवळ (वेशीचे अस्तित्व राहिले नाही.) पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू एकांकात पातूरहून आलेगावला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 87 स्था. पो.) व पूर्वार्धात पैठणहून रिद्धपूरला जाताना इसवीहून आलेगावला आले. त्या वेळीही त्यांचे येथे एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 146, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. आरोगणा स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या दक्षिण बाजूस 1 फूट 10 इंच अंतरावर आहे. (पू.ली. 146)

देवळाच्या सभामंडपातील गाभाऱ्याच्या दरवाजाच्या उत्तर बाजूचे स्थान मांडलेले आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. आरोगणा स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या देवळापासून दक्षिणेस एक फलांग अंतरावर निर्गुणा नदीच्या पात्रात उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञांनी एकांकामध्ये गावात भिक्षा करून येथे आरोगणा केली. (ए. ली. 76 ख. प्र.)

एकांकातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथून इसवीला गेले व पूर्वार्धातील एक दिवसाच्या वास्तव्यानंतर ते येथून पातूरला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. परिश्रय स्थान


आलेगावची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 87
  • Aalegaon : आलेगावीं वसति :॥:
  • सर्वज्ञें म्हणीतलें : मग हे तेथौनि निगाले : (पातुरडी स्मशानवस्त्र स्विकारु : या लीळेनंतर) आलेगावीं पाणिपात्र जाले : नदीं आरोगणा जाली : लिंगाचां देउळीं वसति जाली :॥: (…येथे स्वामी दुसर्यांदा आले. पुढे स्वामी पातुरला गेले… येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे :॥:)
  • Purvardha Charitra Lila – 146
  • Aalegaon : आलेगावीं लिंगाचा देउळीं वस्ति:।।:
  • मग गोसावी आलेगावांसि बिजें केलें: लिंगाचा देउळीं नावेक आसन जालें: गोपाळाचा देउळी आसन जालें: विहरण केलेः बाइसीं चरणक्षाळण केलेः मग उपहार निफजविलाः गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विळीचां पूजावसरू जालाः गावां मध्यें एल्हनेस्वराचें देउळः तेथ वस्ति जालीः उदेयाचि गोसावी परिश्रयासि बिजें केलें: परिश्रयोसारूनि उदका विनियोग जालाः मग गोसावी तेथौनि बिजें केलें:।।: (…येथे स्वामी दुसर्यांदा आले. पुढे स्वामी पातुरला गेले… येथील विसृत लीळा नाही, फक्त एवढीच लीळा आहे :॥:)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: