Tivsa (तिवसा)

तिवसा, ता. तिवसा जि. अमरावती


तिवसा येथील येथील 2 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) -  2 ठिकाणी गावाबाहेर आहेत.
1 स्थान गावाच्या पश्चिमेकडे नदी काठावर आहे. येथील पूजार्याचे 'आकाशदीप' कापड दुकान बसथांब्या जवळ आहे तेथुन चावी न्यावी लागते.
1 स्थान गावाच्या पूर्वेकडील भागात पावर स्टेशन जवळ टेकडीवर आहे.


जाण्याचा मार्ग :

तिवसा हे गाव, मुंबई-कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर अमरावतीहून ईशान्येस 41 कि. मी. आहे; व नागपूरहन पश्चिमेस 111 कि. मी. आहे. नेरपिंगळाईहुन आग्नेयेस तिवसा 21 कि. मी. आहे. आखतवाड्याहन तिवसा (नेर, धानोरा, तळेगाव मार्गे) 15 कि. मी. आहे. हा पायमार्ग आहे. 


स्थानाची माहिती :

1. दांडी खालाविणे स्थान :

हे स्थान तिवसा गावाच्या पश्चिमेस पिंगळाई नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. देवळाच्या नैर्ऋत्य कोपऱ्यातले स्थान व दांडी खालाविणे स्थानाच्या उत्तरेचे स्थान ही दोन्हीही स्थाने मांडलिक आहेत. एस. टी. बस स्थानकाजवळ श्री. वाइंदेशकर पुजारी यांचे ‘आकाशदीप ड्रेसेस’ नावाचे कापड दुकान आहे. त्या दुकानावर देवळाची चावी असते.

लीळा : श्रीगोविंदप्रभू शेंदूरजनाबाजारहून तिवशाला आले. येथे पालखी थांबविली. त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा विडा झाला. मग ते येथून भिष्णूरला गेले. (ऋ. प्र.ली. 230, स्था, पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. दांडी परित्यजणे स्थान :

हे स्थान तिवसा गावाच्या पूर्वेस पॉवर हाऊसच्या पाठीमागे लहानशा टेकडीवर पूर्वाभिमुख देवळात आहे. 

दांडी परित्यजणे स्थानाच्या नैर्ऋत्येचे स्थान व वायव्येचे स्थान, ही दोन स्थाने मांडलिक आहेत.

लीळा : श्रीगोविंदप्रभू भिष्णूरला निघाले होते; परंतु भक्तजन थकले होते. भुकेलेले होते. म्हणून त्यांनी पालखी येथेच ठेवली. दिवस मावळेपर्यंत ते येथेच होते. मग चरणचारी चालत भिष्णूरला गेले.(भी.प्र.ली. 218, स्था.पो.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


तिवशाची एकूण स्थाने : 2


  • Govind Prabhu Charitra Lila – 240
  • Tivsa : माळधरा दांडी खालवणे :॥ तीवसा दांडी खालवणे :॥ सेंदुरजनी दांडी खालवणे :॥वरान उतरौनि भीस्नौरी अवस्थान:॥
  • मग खडकीए दांडी सांडीली : आवी भगवतीजनें टणकली : तीय राहीली : भट माहादाइसें ये दोघे गोसावियांसवें नीगाली : तवं रात्री जाली : मग गोसावी आरचि वरान उतरले : गोसाविया मागें भट माहादाइसें उतरली : तयाचेया आवारासि बीजें केलें : यकादसीचा दीम : तीये अवघीं वेसि घालुनि जागरना गेली होती : मटी वेसि माथां घेउनि उघडीली : माहादाइसी साउले फाडुनि काकडा केला : वाति लावीली : डेरामरि पाणीया तापतु होता : तेणें गोसावियाचे श्रीचरण प्रक्षाळीलें : मग भटाचे पाय धुतले : मग आपुले धुतले : मग मट तयातें बोलवाबया गेले : तयाते महणीतलें : ‘आगा! काइ जागरण करीत असा : राउळ तुमचेया घरासि आले असेति :” मग ते आवघेचि आले : गोसाविया से दंड. बत घातलें : श्रीचरणा लागले : मग गोसावियासि मर्दना मादणे जालें : पुजा केली : वन वोळगवीलें : मग आरोगणा जाली : पाट-बाज घालुनि सुपवति घातली : तीयवरि न नीजति : आवषया बाजा धातलीया : तयावरि न नीजति : मग लेकरवें नीजैली होती : मग गोसावी म्हणीतलें : “आवो हे घाल घालि :” म्हणौनि तिय बाजेपासि बीज केलें : मग लेकर उठवीली : मग तीय बाजेकरि पहुड स्वीकरीला : मग म्हणीतलें : “ऐया माशा होय म्हणे :” मी म्हणीतले : ” जी जी! आता को नव्हे : लेंकरुवें तवं उठवीली की “” आवो मेली जाय ” म्हणौनि हास्य केलें : मग मी माहादाइसी आंघोळ केलीया : माहादाइसी मणीतलें : “नागदेया जेवि:” भटौं म्हणीतले : ” तुमी यकादसि मोडाल तरि मी जेवीन : ” संग्रहेन म्हणीतलें : ” ना : हो का: ” मग दोघे जेवीली :॥ २४०।।



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: