Thugaon (थुगाव)

थूगाव ऊर्फ पूर्णानगर, ता. भातुकली जि.


थूगांव येथील 3 स्थान गांवाच्या पश्चिमेकडे 1.5 कि.मी.अंतरावर पूर्णा नदीच्या काठावर मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

थूगाव, अमरावती-परतवाडा मार्गावर अमरावतीहून वायव्येस 27 कि. मी. आहे व परतवाड्याहून आग्नेयेस 23 कि.मी. आहे. राम्याहून नैर्ऋत्येस थूगाव 5 कि.मी. आहे. थूगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) (खालील सर्व स्थान)

1. वसती स्थान :

हे स्थान थूगावच्या वायव्येस तीन फलांग अंतरावर थूगावहून येलकी गावाकडे जाणाऱ्या पाऊल वाटेवर पूर्णा नदीच्या पूर्व काठी उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे ऊर्वेश्वराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना वाकीहून थूगावला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. दुपारचा पूजावसर, गुळळा, विडा व रात्रीची व्याळी गुळळा, विडा येथेच झाला. (पू. ली. 160 ख प्र. , स्था. पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून राम्याला गेले.


2. देवळाच्या उत्तरेचे परिश्रय स्थान :

हे स्थान वसती स्थान मंदिराच्या अंगणातील पश्चिमाभिमुख मंदिरात आहे.


3. देवळाच्या पूर्वेचे वडाच्या झाडाखाली उभे राहणे स्थान :

हे स्थान वसती स्थान मंदिराच्या पूर्वेस पश्चिमाभिमुख मंदिरात आहे.

लीळा : चांगदेव भट्ट जोपर्यंत उदक आणायला गेले तोपर्यंत सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू येथे चरणाचारी अभे राहिले.


थूगाव ची एकूण स्थाने : 3


  • Purvardha Charitra Lila – 160
  • Thugaon : थुगावीं उर्वेस्वरीं/रेमेस्वरीं वस्ति :।।:
  • गोसावी थुगावीं बिजें केलें: उर्वेस्विराचें देउळ पूर्वाभिमुखः जगतिसि दोनि दारवंठेः एक पूर्वाभिमुखः एक दक्षिणाभिमुखः दक्षिणीलेनी दारवंठेनि बीजें केलें: चौकीं आसन जालें: चांगदेवभट भिक्षा करौनि आलें: मग गोसावियांसि व्याळी जालीः गुळळा जालाः विडा ओळगवीलाः पहूड जालाः उपहूड जालाः पहाटांचि उत्तरीली जगतिसि खिडकीः तियें खिडकीहिूनि उत्तरें परिश्रया बिजें केलें: परिश्रयोसारूनि उदकां विनियोग जालाः मां पूर्विला दारवंठां वडः जवं चांगदेवभट येति तवं तया वडातळीं नावेक श्रीचरणचारीं उभे राहिलेः वड अवलोकिलाः मग भितरीं बिजें केलें: नावेक आसन जालें: मग पूर्विली दारवंठेंनि बिजें केलें :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-एळवन-लाखापुरी-सिंनापूर-वाठवडा-वाकीवरुन येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: