Talvel (तळवेल)

तळवेल ता. चांदूरबाजार जि. अमरावती


तळवेल येथील 1 स्थान - तळवेल येथील स्थान गांवातच इशान्येकडे डाँ.आम्बेडकर चौकाजवळ आहे.


जाण्याचा मार्ग :

तळवेल हे गाव, वलगाव चांदूरबाजार मार्गावरील तळवेल फाट्यापासून 2 कि. मी. आहे. वलगाव ते तळवेल फाटा 17 कि. मी. चांदूरबाजार ते तळवेल फाटा 11 कि. मी. अमरावती ते तळवेल 29 कि. मी. खराळ्याहन नैर्ऋत्येस तळवेल पायमार्गे 5 कि. मी. आहे. तळवेलला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान तळवेल गावाच्या पूर्व विभागी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ मंगल कार्यालयाच्या पाठीमागे पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पैठणहून रिद्धपूरला जाताना साऊरहुन तळवेलला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 163 स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून खराळ्याला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनपलब्ध स्थाने :

1. परिश्रय स्थान


तळवेलची एकूण स्थाने : 2


  • Purvardha Charitra Lila – 163
  • Talvel : तळवेलीं लिंगाचा देउळीं आसन :।।: तळवेलीये वस्ति :।।:
  • गोसावी तळवेलीयेसि बिजें केलें: लिंगाचा देउळीं आसन जालें: मग चांगदेवभटीं चरणक्षाळण केलें: गोसावियांसि उदक ओळगवीलेः गुळळा जालाः विडा ओळगवीलाः चांगदेवभट भिक्षा करू गेलेः भिक्षा करौनि आलेः गोसावियांसि झोळी दृष्टीपूत केलीः मग आरोगणे विनविलें: गोसावियांसि आरोगणा जालीः गुळळा जालाः विडा ओळगवीलाः आपण जेविलेः गोसावियांसि तेथचि वस्ति जाली :।।:
  • (टिप – स्वामींचे येथे हे पहील्यांदा येने. आपल्या पूर्वार्ध परिभ्रनण काळात स्वामी विसैये-आलेगाव-पातुर-सिंनापूर-वाठवडा-वाकी-थुगांव-साऊरवरुन येथे आले व पुढे रिद्धपूरकडे निघाले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: