Talegaon (तळेगाव)

तळेगाव, ता. मोर्शी जि, अमरावती


येथील 2 स्थाने एकाच परिसरात आहेत - तळेगांव येथील 1 स्थान (श्रीगोविंदप्रभुबाबा) तिवसा रोडवर कडेलाच मंदीर आहे. व 1 स्थान (आमचेस्वामी) विरुद्ध बाजुला वरील स्थानांच्या थोड्या अंतरावर आहे.


जाण्याचा मार्ग :

दाभेरीहुन ईशान्येस तळेगाव पायमार्गे अडीच कि. मी. आहे. तळेगाव, परतवाडा-तिवसा मार्गावर रिद्धपूरहुन आग्नेयेस 5 कि. मी. आहे व तिवशाहुन वायव्येस 36 कि. मी. आहे. लेहेगाव ते तळेगाव 11 कि. मी. तळेगावला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे तेथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान तळेगावच्या वायव्य विभागी पूर्वाभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे लिंगाचे देऊळ होते.

लीळा : रिद्धपूरला श्रीगोविंदप्रभूच्या पासून ज्ञानशक्तीचा स्वीकार केल्यावर त्याच दिवशी सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू रिद्धपूरहुन तळेगावला आले. त्यावेळी त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 20, स्था. पो. उ. को. प्र.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. दांडी खालाविणे स्थान (श्रीगोविंदप्रभू चरणांकित) :

हे स्थान तिवसा सडकेच्या उत्तर बाजूस तळ्याच्या नैर्ऋत्य काठी दक्षिणाभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू शिरखेडहून रिद्धपूरला येताना तळेगावला आले. या ठिकाणी पालखी थांबविली. त्यांना येथे आसन झाले. गुळळा, विडा झाला. महाजनांची भेट, त्यांच्या विनंतीचा स्वीकार. (गो.प्र.च. 247, स्था.पो.उ.प्रत)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


तळेगावची एकूण स्थाने : 2


  • Govind Prabhu Charitra Lila – 247
  • Talegaon : इस्वरनायका आभर्तणी रीघपुरा प्रयाण :॥
  • इस्वरनायका आभर्तणी रीघपुरा प्रयाण : ॥ मग गोसावी सीरखेडासि बीज केलें । ऐसें आइकौनि इखरनायक आले : गोसांवियासि भेटि जाली : मग दंडवत घातलें : श्रीचरणा लागले : मग गोसावियांतें वीनवील ” जी जी ! गोसावीं रीधपुरासि बीजें करावें जी ! बहुत दीस जाले जी!” मग गोसांवीं वीनवणी स्वीकरीली : मग गोसावी घोडेयावरि आरोहण केलें : एकी वासना : दांडीयचिवरि आसन जालें : ऐसे रीधौरीयासि बीजें कलें : तळेगावी तळेयाचीय दक्षीणीली पाळी दांडी खालवीली : मग बाजे केलें : मांगजैसी खेळू केला : मग मढासि बीज केलें ॥ २४७ ॥
  • Purvardha Charitra Lila – 20
  • Talegaon : श्रीप्रभू भेटी :॥
  • श्रीप्रभू आमचेयां गोसावीयांचेया श्रीमुखावरि श्रीकरू ठेविलाः तेथ आमचा गोसावीं ज्ञान-शक्ती स्वीकरिलीः परावर-शक्ति स्वीकरिलीः आमचा गोसावीं पूर्वीलेनि दारवंठेनि बीजें केलेंः श्रीप्रभू माहाद्वारवरि बोळवीत आलेः तेयां दीसी तळेगावी वस्ति जालीः ज्ञानाचे कार्य ऐसेंः जें ज्ञानापाठी वैराग्य उपजेः मग गोसावीं तेही स्वीकरिलें।



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: