Takarkheda (टाकरखेडा)

टाकरखेडा (संभू) ता. भातकुली जि. अमरावती


टाकरखेडा(संभु) येथील 1 स्थान - टाकरखेडा(संभु) येथील स्थान गांवाच्या उत्तरेकडे जुना साऊर रस्ता आहे, या रस्त्याचे बाजुला माहादेव मंदीराच्या मागे आपले मंदीर आहे.


जाण्याचा मार्ग :

टाकरखेडा हे गाव, आसेगाव यावली मार्गावर साऊरहन दक्षिणेस 3 कि. मी. आहे. अमरावती ते टाकरखेडा 24 कि. मी. टाकरखेड्याला जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान टाकरखेडा गावाच्या उत्तरेस जुन्या साऊर रस्त्यावर महादेवाच्या देवळाच्या पश्चिमेस दक्षिणाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात शिराळ्याहून टाकरखेड्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू. ली. 171, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून आष्टीला गेले.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


टाकरखेड्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 171
  • Takarkheda (Sumbhu) : टाकरखेडां वसति :॥:
  • गोसावी उदेयाचि टाकरखेडयांसि बीजे केले : सिद्धनाथाचां देउळि आसन जालेः बाइसीं श्रीचरणक्षाळन केलें: उपहारु निफजविलाः गोसावीयांसिं आरोगणा जाली : गुळुळा जालाः विडा ओळगविलाः मग गोसावी पहुड स्विकरीलाः भक्तिजनां प्रसादु जालाः गोसावीयांसिं तेथचि वसति जाली :॥:
  • (येथे हे पहील्यांदा येने. स्वामी ऋद्धपूरवरुन बेलौरां-सिराळां मार्गे आले…)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: