Shirkhed (शिरखेड)

शिरखेड, ता. मोर्शी जि. अमरावती


येथील 9 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) - 2 ठिकाणी आहेत. गावात व गावाबाहेर.
7 स्थाने गावातच नानागुरु महाराज आवारात आहेत.
गावाबाहेरील 2 स्थाने गावाच्या पूर्वेकडील भागात मंदीरात अर्धा की.मी.अंतरावर आहेत.


जाण्याचा मार्ग :

शिरखेड हे गाव मोर्शी-अमरावती सडकेवरील शिरखेड फाट्यापासून पश्चिमेस 1 कि. मी. आहे. मोर्शी ते शिरखेड फाटा 14 कि. मी. लेहेगाव ते शिरखेड फाटा 3 कि. मी. पाळा ते शिरखेड फाटा (मोर्शी मार्गे) 20 कि. मी. शिरखेड फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. महाजना भेटी स्थान :

हे स्थान शिरखेड गावाच्या आग्नेयेस दोन फर्लाग अंतरावर सडकेच्या दक्षिणेस उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभू आखतवाड्याहन आल्यावर शिरखेडचे महाजन त्यांना गावात घेऊन जाण्यासाठी वाद्ये वाजवीत येथे आले. या ठिकाणी श्रीगोविंदप्रभूची व महाजनांची भेट झाली. (गो. प्र. च, 244, स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. चौबारा आसन स्थान :

हे स्थान महाजना भेटी स्थानापासून नैर्ऋत्येस सुमारे 250 फूट अंतरावर उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : महाजनांची भेट झाल्यावर श्रीगोविंदप्रभूना येथे आसन झाले. मग ज्यांच्याजवळ जी वस्तू ती त्यांनी श्रीप्रभुंना अर्पण करून नमस्कार केला. त्यानंतर महाजनांनी त्यांना वाजतगाजत गावात नेले. (ऋ, प्र. ली. 235)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


गावातील स्थाने

ही स्थाने शिरखेड गावात नानागुरु महाराज संस्थानाजवळ पश्चिमाभिमुख देवळात आहेत. 

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील सातही स्थाने.

3. अवस्थान स्थान :

हे स्थान देवळाच्या नैर्ऋत्य विभागी आहे. श्रीप्रभूच्या वेळी येथे कमळनायकांचा आवार होता. त्या आवाराच्या देव्हारचौकीतील हे स्थान होय.

लीळा : श्रीगोविंदप्रभूचे येथे तीन दिवस वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून रिद्धपूरला गेले. (गो. प्र. च. २४४, स्था. पो.) 



4. आरोगणा स्थान :

हे स्थान अवस्थान स्थानापासून पूर्वेस 6 फूट 6 इंच अंतरावर आहे. (स्था.पो.) 


5. श्रीचरण प्रक्षाळण स्थान :

हे स्थान आरोगणा स्थानापासून पूर्वेस 6 फूट 10 इंच अंतरावर आहे.

लीळा : येथे कमळनायकांनी श्रीप्रभूचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (ना, प्र. ली. 279, स्था. पो. उ. प्र.)


6. आसन स्थान :

हे स्थान मंदिराच्या वायव्य विभागी आहे. (ऋ.प्र.ली. 236)


7. मादने स्थान :

हे स्थान आसन स्थानापासून पूर्वेस 3 फूट 2 इंच अंतरावर आहे. (स्था.पो.)


8. मर्दना स्थान :

हे स्थान मर्दना स्थानापासून पूर्वेस 7 फूट अंतरावर आहे. (स्था. पो.)


9. आड अवलोकणे स्थान :

हे स्थान आवारातील स्थानांच्या उत्तरेस बोळीमध्ये श्री. पंजाबराव भोकरे यांच्या घराजवळ पश्चिमाभिमुख देवळात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे उभे राहून आड अवलोकन केला. (स्था.पो.)


अनुपलब्ध स्थान : 

1. परिश्रय स्थान


शिरखेडची एकूण स्थाने : 10


  • Govind Prabhu Charitra Lila – 244
  • Shirkhed : सीरखेडी अवस्थांन :॥
  • सीरखेडी अवस्थांन : ॥ मग गोसावीं सीरखेडेयासि बीजें केलें : माहाजन आवघे साउमें आले : तुरे मांदळ वाजत गात वात नाचत बींबत चीपोळीया वात आले : गोसांवियांसि दंडवत घातलें : श्रीचरणा लागले : मग गोसावियांतें वीनवीलें : गोसावीं वीनवणी स्त्रीकरीली : मग गावांमधीं घेउनि गेले : कमळनायकाचा घरी अवस्थान जालें : गोसांवियासि पदणी वोळगवीली : मग मर्दनमादणें जालें : पुजा आरोगण जाली : मग पहुहु जाला : ऐसे तेथ त्रीरात्री अवस्थान जालें : ॥ २४४ ॥
  • Govind Prabhu Charitra Lila – 245
  • Shirkhed : मृत्य स्त्री जीववणे :॥
  • मृत्य स्त्री जीववणे : ॥ कमळ-नायकाचीय स्त्रीयासि बरु होता : सात लंघनें पडीली : मग ते सरली : मग आवी रडों लागली : बाहीरि कीडडी केली : सर्पने स्मसानांसि नेली : तवं गोसावीं उगेचि बैसले होते : हास्य करीति : टाळी वाति : मग तीयपासि बीजें करीति : श्रीकरें-करुनि तोंडावरीला पदर परता केला : मग म्हणीतलें : “ आवो मेली जाय : उठि उठि उठि ना म्हणे : ” म्हणौनि तोंडावरि श्रीकरें हाणितलें : खडपडौनि उठीली : दंडवत घातले : श्रीचरणा लागली : मग गोसावी म्हणीतले : ” आवो मेली जाय : ताक आंबीलि जेंउ घालि म्हणे : ” मग ते उठीली : थाळा धुतला : मग ताक आंबीलि वाढीलि : गोसावियासि आरोगणा जाली : मग गुळुळा वीडा जाला : मग आवधेया लोकासि आश्चर्य वीस्मो जाला : ॥२४५॥
  • Govind Prabhu Charitra Lila – 246
  • Shirkhed : तथा वस्त्र-पुजा स्वीकारु: :॥
  • तथा वस्त्र-पुजा स्वीकारु: ॥ मग तीही वडे मांडे अमृतफळे : खीरि : घारीया पुरिया उंबरें फेणियां साकर-मांडे खीरि ऐसा बरवा पदाथु उत्तमु नीफजवीला : बरवं वस्त्र घेतलें : भक्तासि कोरडें दीधलें : मग तीही रंधन केलें : मग तीही गोसांवियांसि पडदणी वोळगवीली : मर्दनां मादणे जालें : मग पुजा केली : वस्त्र वोळगवीलें : तीही भक्तीजनाते पुसीलें : “ तुम्हा आंतु दीघीचा मेइदेओ होता ( आहे): तो कोणु ?” मग भक्तीजनी म्हणीतलें : “तुम्ही नोळखा ? ” ” ना आम्ही नोळखों : ” तीही म्हणीतलें : ” तो पैलु बैसला असे : तेथ तयाचे सोयरे :” मग क्षेव दीधलें : मग गोसांवियांसि ताट केलें : गोसांवियांचीय पाती कोथळोबासि वाढीले : यर आवघे भक्तीजने गोसावियांचीय दृष्टीपुढे पाती बैसले : मग गोस!वियांसि आरोगणा जाली : मग गोसांवियांसि गुळुळा जाला : मग गोसावी म्हणीतले ” आवो मेली जाय : घे घे घे ना म्हणे : आवो हे खाय खाय : गोड आहे म्हणे : ” म्हणौनि कोथळोबा. कडे ताट लोटीले तीही म्हणीतलें : ” जी जी : माहाप्रसादु !” म्हणौनि घेतला : जेउं लागले : तेवीचे भगतीजनासि वाकुलीया दावीति : मगतीजनें म्हणेति : ” आतांचा तव घेइ लबका : गळेवरि :” मग ताट धोउनि पाळाले ( पीयाले ) : खालीले सीतें सावडनि तयाचीया स्त्रीया भीतरि घेतली : ॥२४६॥
  • Govind Prabhu Charitra Lila – 247
  • Shirkhed : इस्वरनायका आभर्तणी रीघपुरा प्रयाण :॥
  • इस्वरनायका आभर्तणी रीघपुरा प्रयाण : ॥ मग गोसावी सीरखेडासि बीज केलें । ऐसें आइकौनि इखरनायक आले : गोसांवियासि भेटि जाली : मग दंडवत घातलें : श्रीचरणा लागले : मग गोसावियांतें वीनवील ” जी जी ! गोसावीं रीधपुरासि बीजें करावें जी ! बहुत दीस जाले जी!” मग गोसांवीं वीनवणी स्वीकरीली : मग गोसावी घोडेयावरि आरोहण केलें : एकी वासना : दांडीयचिवरि आसन जालें : ऐसे रीधौरीयासि बीजें कलें : तळेगावी तळेयाचीय दक्षीणीली पाळी दांडी खालवीली : मग बाजे केलें : मांगजैसी खेळू केला : मग मढासि बीज केलें ॥२४७॥



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: