Pala (पाळा)

पाळा ता. मोर्शी जि. अमरावती


पाळा येथील 1 स्थान (आमचे स्वामी) - गावालगतच पूर्वेकडे माडु नदीपलीकडे काठावर मंदीरात आहे.


जाण्याचा मार्ग :

पाळा हे गाव, मोर्शी सालबर्डी मार्गावर मोर्शीहन उत्तरेस 6 कि. मी. आहे व सालबर्डीहून दक्षिणेस 4 कि. मी. आहे. पाळा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. 


स्थानाची माहिती :

1. वसती स्थान :

हे स्थान पाळा गावाच्या पूर्व विभागी माडू नदीच्या पश्चिम काठावर उत्तराभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभुंचे एकांकात येथे एक रात्र वास्तव्य होते. (ए. ली. 28 ख. प्र.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


पाळ्याचे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila – 28
  • Pala : जूतक्रीडा/कृडास्वीकारें नित्य रांधवनहाटीं आरोगणा :।।:
  • गोसावीयांसि एक सुडा कटीप्रदेशीं: एक सुडा श्रीमुगुटीं: ऐसें वराडांतुल पाळेया देवठाणेयासि जुंआठेयासि बिजें केलें: जुंआरी खेळत होतेः तवं तें कव्हणीचि गोसावियांची वास न पाहातीचिः गोसावी जुआरियांतें म्हणितलें: ‘‘नादतीरेः कड जागरेः धुरे एकी पवाडु आति?’’ तेहीं ऐसीं वास पाहिलीः देखौनि चमत्करले आणि म्हणितलें: ‘‘येइजो जी येइजोः’’ म्हणौनि तें परते सरलेः मध्यें पवाडु केलाः गोसावियांसि बैसो घातलें: गोसावी आसनी उपविष्ट जालें: चहुं डाइं जूं पडित असेः कडः जागडः नाभित्रेयः तथा नादत्रेय नाहीं: तेहीं गोसावियांसि विनविलें: ‘‘घेइजो जी एक दानः’’ गोसावी एक दान घेतलें: पाउगीयापासौनि फेर घेतलाः गोसावी पुेंजेचे कवडे श्रीकरी घेउनि ऐसें ऐसें चोपिलेः तेंही जाणीतलें: ‘गोसावी जुआरी होतिः’ मग गोसावी खेळों लागलेः अवघांसि जो पाणी पेवों सुये तेणें आधि गोसावियांसि उदक ओळगवीलें: मग गोसावी उदक स्वीकरिलें: जो अवघांसि विडा देः तेणें गोसावियांसि विडा ओळगवीलाः गोसावी विडा स्वीकरिलाः मग गोसावी वीळवेर्‍ही खेळ स्वीकरिलाः अवघें जुवारीं हारविलें: बहुत कवडे जिंकिलेः लाहान लाहान कुरंगे कवडे वेंचलेः तें वेगळे केलेः एर कवडे पाणी पाजीः विडा ओळगवीः गंधवादीः धुळी तया वेचिलेः तथा विदावंतां भाटां तांबुळीयां वेचिलें: एकां पवित दिधलें: ऐसें जे जे सेवक तयासि अवघेयासि दान दिधलें: मग पीवळे कुरंगे कुरंगे कवडे वेगळे केले होतेः तें श्रीकरीं ऐसां पसाभरी घेउनि श्रीदोंदेसि धरिलेः रांधवनहाटा उभियां हाटवटीया हाटवटीया बिजें केलें: मां हाटवटियेचीं मनुष्यें सोवनीः दुसीः वाणियेः भुसारीः तेलीः तांबोळीः ऐसें अवघे आपुलाले व्यापार करित होतेः तें अवघे श्रीमूर्तिचे सौंदर्य देखौनि वेधें तटस्ते जालें: तयाचे व्यापार तैसेचि राहिलेः गोसावियांसि बिजें करिता श्रीमूर्ति दिसे तवं पाहातचि असतिः ऐसीं गोसावी अवघी हाटवटी वेधिलीः जो गोसांवींातें देखे तो आपुलाला व्यापारू सांडौनि दृष्टी फाके तवं पांतुचि असेः ऐसें गोसावी रांधावनहाटासि बिजें केलें: तेथ म्हणितलें: ‘‘कवडां जेवण अन्न जोडे वोः’’ ‘‘येइजो जीः येइजो जीः’’ म्हणौनि एकीं बोलाविलें: कवडे तयांसि दिधलेः तेंही मर्दना दिधलीः मार्जनें केलें: तेंहीं आपुलीं वस्त्रे ओळगवीलीः महिमेसारिखी आरोगणाः मग गोसावी आरोगणा करितां तया अन्नासि रूप करीतिः ‘‘अमुकें अमुकेयासि पूरलें: अमुकेयासि अमुकें न पूरेचिः’’ ऐसें रूप करीतिः तेणें तयांसि सुख होएः मग तियें बाजसुविती घालीतिः मग पहूड स्वीकरीतिः उदेयां सीं फिटे तवं तेथं असतिः मग तयांचीं वस्त्रें ठेउनि जूंआठेया बिजें करीतिः अवघे पाहों ठाकतिः जवं देखति तवं पाहातिः तवं जूंआठेयाकडें भाट विदावंतें वाट पाहातिः ‘कालिचा जगदानि तो आझुइं न येः’ तवं बिजें करीतिः येही दिसीं जिंकितिः आरोगेपुरतें ठेवीतिः एर वेचीतिः आधिली दिसीचियां रांधवणी दुना लाभु होएः तियें गोसावियांची वाट पाहातें असतिः तियें दिसीं आणिका घरा बिजें करीतिः मग तें म्हणेः ‘‘येइजो जीः येइजो जीः भितरीं बीजें किजो जीः’’ मग गोसावी भितरीं बिजें करीतिः तिया बैसों घालीतिः मां गोसावी पसाभरी कवडे श्रीदोंदेशी धरिले असतिः तें ऐसें टाकौनि माजघरीं घालीतिः मग आसनी उपविष्ट होतिः मां तिया गोसावियांचे श्रीचरण प्रक्षाळीतिः वोलनी देतिः मर्दनामार्जने होएः मग आपुली वस्त्रे ओळगवीतीः चंदन ओळगवीतीः लल्हाटी चंदनाचा आडा रेखीतिः पूजा होएः मग उचा मोलाचें ताट करीतिः मग गोसावियांसि आरोगणा होएः गुळळा होएः विडा होएः सर्वज्ञें म्हणितलेः ‘‘बाइः तें आरेागणा कवडेयासारिखी नव्हेः तें अनुरागपर होएः परत्रबुद्धी आरोगणा देतिः गिर्‍हाइक बुद्धी नेदीतिः’’ मग बाजसुविती झाडीतिः आंथुरीतिः गोसावी तेथ पहुड स्वीकरीतिः श्रीचरण क्षाळण करीतिः श्रीचरण सहवान करीतिः तियें दिसीं तियेसि थोर विकरा होएः लाभ होएः मग उदेयाचि गोसावी आपुली वस्त्रे वेढीतिः तयाचीं ठेवीतिः नावेक सीं फिटों देतिः मग बिजें करीतिः तियें अवघी जुंहाटेयासि येतिः आणि तें जुंआरी गोसावियांची वाट पाहात असतिः अवघे म्हणतिः ‘‘आजी तो महादानी जिंको आणि काइः’’ भाट विदावंत म्हणतिः ‘‘हां गाः कोलची धूर आझुइं कां न येः कालिचा महादानि जगदानि आझुइं कां न येः’’ ऐसीं गोसावियांची वाट पाहात असतिः ऐसीं दोही वोळी जेतुकीं रांधवनें घरें: तेतुका घरीं एक एक दिस आरोगणा होएः ऐसें अवघेया रांधावनहाटा उभय वोळीचीया रांधवणी तितुकियांसि सेवा संबंध दिधलाः मग बिजें केलें :।।: (गोसावी हिवरळीये आपलोउपरि हें लीळा सांघितलीः सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘बाइः हें जूं खेळें: हें जिके परि हारवीनाः।:’’)



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: