Najarpur (नझरपूर)

नझरपूर, ता. चांदूरबाजार जि. अमरावती


नजरपूर येथील 2 स्थाने (आमचे स्वामी व श्रीगोविंदप्रभुबाबा) - बोरज येथील 2 स्थाने एकाच ठीकाणी आहेत. नजरपूर गांवापासून 1 कि.मी. अंतरावर शेतात आहेत.


जाण्याचा मार्ग :

नझरपूर हे गाव, चांदूरबाजार-रिद्धपूर सडकेवरील नझरपूर फाट्यापासून दक्षिणेस एक कि. मी. आहे. चांदूरबाजार ते नझरपूर फाटा 2 कि.मी, रिद्धपूर ते नझरपूर फाटा 2 कि.मी.


स्थानाची माहिती :

Google Map Location Link 👈 (किल्क करा) खालील चारही स्थान

1. आसन स्थान :

हे स्थान नझरपूर गावाच्या आग्नेयेस दीड कि. मी. अंतरावर पूर्वाभिमुख देवळात आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात खराळ्याहून येथे आले. त्यांना या ठिकाणी आसन झाले. गुळळा झाला. विडा झाला. मग ते येथून रिद्धपूरला गेले. (पू. ली. 165, स्था. पो.)


2. श्रीप्रभू चरणांकित स्थान :

हे स्थान आसन स्थानाच्या उत्तर बाजूस आहे. (स्था.पो. ,पू.ली. 165)

3. माल्हनदेवीशी खेळ करणे स्थान :

हे स्थान मंदिराच्या सभामंडपात आहे.


4. आड अवलोकणे स्थान :

हे स्थान मंदिर परिसरात आहे.


नझरपूरची एकूण स्थाने : 4


  • Purvardha Charitra Lila – 165
  • Najarpur :  रीधपुरी श्रीप्रभुदरीसन
  • रीधपुरी श्रीप्रभुदरीसन ” ऐसे गा श्रीप्रभूः ” ऐसें नीरोपण करीतकरीत माल्हणदेवीसि बीजें केलेंः तवं श्रीप्रभूची पातलें देखिलीः मग सर्वझें म्हणीतलेः ” बटिकाः देखिलें गा ? श्रीप्रभू आतांघि एथ बीजें केलें होतें : एं देखिलीं श्रीप्रपूर्वी पाउलें ? ” ऐसें म्हणीतलेंः रज वंदिलें : तेथ नावेक आसन जालेंः गुळुळा जालाः वीडा जालाः मग गोसावीं बीजें केले ऐसें प्रमेस्वरपुर पावलेः ।। बाइसीं श्रीप्रभूसि पुजा केलीः श्रीप्रभू खेळावेया माल्हणदेवीकडे बीजें केलें : बाइस तळेयाचीए पाळी बहीरवींहुनि उभी ठाकौनि गोसावीयांची वाट पाहातें होतीः श्रीप्रभू माल्हणदेवीसी खेळु करूनि अळंदीयासि बीजें केलें मागिलीचिकडोनि गोसावी बीजें करीत असतिः तवं बाइसी गोसावीयांतें अळगौनि देखिले आणि हरिखैलीः आणि तेथौनि धावं घेतलीः गोसावीयां उजुचि आलीः पावतपावतां गोसावीं श्रीमुखेंः श्रीकरेंः श्रीनेत्रेः तीही काकु वारिलीः सर्वज्ञ म्हणीतलेः ” बाइः राहाः ” श्रीप्रभूकडे दाखवीलेः आणि बाइसें दृष्टीचिए आळिवे राहीलीः मग सर्वज्ञ म्हणीतलेंः ” बाइः श्रीप्रभू कवणीकडे खेळु करीत असति ? ” बाइसी म्हणीतलेंः ” बाबाः हे नव्हतिः बाबा अळंदीयांपासि खेळत असतिः ” मग तेथ बीजें केलेंः दोहीं देवां दरीसन जालें आणि सर्वतें म्हणीतलेंः ” बटिकाः हे देखिलें गा श्रीप्रभूः ” आणि चांगदेओभटी दंडवत घातलेंः गोसावीं चांगदेओभटांतें सांडुनि पुढां बीजें केलेंः दोही अळंदीयांमाजि श्रीप्रभू वेडे करीतातिः ऐली अळंदीएसि तरि दुरिः पैली अळंदीएसि तरि जवळिः एतुलेया मानी दोहीं देवांसि भेटि जालीः गोसावीं पुष्टवीभागी क्षेमाळींगन दीधलें तें श्रीप्रभूसि न मनेचिः “ मेला जाए ‘ : आरेः सोडि सोडि म्हणेः आरेः सोडी ना म्हणेः ” म्हणौनि कोपु नटलेः आणि गोसावीं सोडिलेंः श्रीप्रभू अधरकंपन केलेंः दोन्ही श्रीचरण भूमी बुदबुदकर आफळिलेः दगडें भूमि आफळलीः आमचां गोसावीं श्रीचरणातळील रज घेतलें ते श्रीमुगुटावरि घातले तैसेंचि श्रीप्रभूगोसावीं नगरामध्ये बीजें केलेंः ।।



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: