Boraj (बोरज)

बोरज, ता, चांदूरबाजार जि. अमरावती


बोरज येथील 2 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) - बोरज येथील 1 स्थान चांदुरबाजार ते रिद्धपूर रोडवर रोडवर कडेलाच मंदीर आहे. दुसरे स्थान बोरज हे गांवाजवळच शेतात (श्री कोकाटे) आहे.


जाण्याचा मार्ग :

बोरज हे गाव, रिद्धपूरहून वायव्येस 2 कि. मी. आहे व रिद्धपूर चांदूरबाजार सडकेवरील नझरपूर एस्. टी. बस थांब्यापासून उत्तरेस 1 कि. मी. आहे.


स्थानाची माहिती :

1. बोरजयेशी खेळ करणे स्थान :

हे स्थान बोरज गावाच्या वायव्येस अर्धा फर्लाग अंतरावर श्री. देवदासराव कोकाटे यांच्या शेतात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे बोरजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्रत. ली. 103, स्था. पो.)

शाळेच्या पश्चिमेचे स्थान निर्देशरहित आहे. 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


2. चुडजयेशी खेळ करणे स्थान :

हे स्थान रिद्धपूर-चांदूरबाजार सडकेवर रिद्धपूरहुन पश्चिमेस दोन कि. मी. व चांदूरबाजारहून पूर्वेस तीन कि. मी. अंतरावर रस्त्याच्या उत्तर बाजूस पूर्वाभिमुख देवळात आहे. नझरपूर एस. टी. बस थांब्यापासून पूर्वेस अर्धा कि. मी. अंतरावर हे स्थान आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभूनी येथे चुडजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ केला. (भी. प्रत ली. 103, स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. आड अवलोकणे स्थान

2. पव्हेशी खेळ करणे स्थान 


निर्देशरहित स्थान : 1


चुडजयेचे स्थान मिळून बोरजची एकूण स्थाने : 4




या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: