Belora (बेलोरा)

बेलोरा, ता. मोर्शी जि. अमरावती


येथील 9 पैकी 6 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा) व 3 स्थाने (आमचेस्वामी) 4 ठिकाणी आहेत - येथील 6 स्थाने (श्रीगोविंदप्रभुबाबा)- पैकी 3 स्थाने बेलोरा गावांच्या मधोमध देशमुखपूर्यातील मंदीरात व बाजुला आहेत. 1 स्थान देशमुखपूर्यातील चौफूल्याजवळच्या मंदीरात आहे, 1 स्थान पाण्याच्या टाकीजवळच्या मंदीरात आहे. तर 1 स्थाने बेलोरा गावांच्या पूर्वेकडे 1 कि.मी. अंतरावर रुद्धपूर रस्त्यावर शेतात आहे. 3 स्थाने (आमचेस्वामी)- 2 स्थाने बेलोरा गावांच्या उत्तरेकडे भीमेश्वर नावाच्या लहान मंदीरात व बाजुला आहेत. 1 स्थाने बेलोरा गावांच्या उत्तरेकडे 1 कि.मी.अंतरावर महादेव मंदीराच्या पूर्वेकडे आहे, 


जाण्याचा मार्ग :

काटसुरहून उत्तरेस बेलोरा (मार्गे राजुरा) 7 कि. मी. आहे. चांदूरबाजार ते बेलोरा 7 कि. मी. अमरावती ते बेलोरा 45 कि. मी. रिद्धपूर ते बेलोरा 5 कि. मी. बेलोरा येथे जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे.


स्थानाची माहिती :

1. श्रीगोविंदप्रभूचे अवस्थान स्थान :

हे स्थान बेलोरा गावातील देशमुखपुरा विभागात श्री. मधुकरराव कवीश्वर पुजारी यांच्या घराच्या आवारात आहे. गोविंदप्रभूच्या वेळी येथे रणराखसा काइंदरण्याच्या सोयऱ्याचा आवार होता.

लीळा : श्रीगोविंदप्रभू रिद्धपूरहन बेलोऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी तीन दिवस वास्तव्य होते. (स्था. पो.) त्यानंतर ते येथून शिराळ्याला गेले.


2. मादने स्थान :

हे स्थान उत्तराभिमुख देवघरात आहे. (स्था. पो.)


3. आड अवलोकणे स्थान :

हे स्थान श्री. मधुकर पुजारी यांच्या घराच्या पूर्वेस श्री. गंगारामजी घाटे यांच्या गोठ्यात आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे उभे राहून आड अवलोकन केला. (स्था. पो. को. मा. शा. प्रत) आडाचे अस्तित्व राहिले नाही.


4. दुर्गादेवीच्या मूर्तीशी खेळ करणे स्थान :

हे स्थान देशमुखपुऱ्याच्या चौफुलीजवळ पूर्वाभिमुख देवळात आहे..

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी येथे उभे राहून दुर्गादेवीच्या मूर्तीशी खेळ केला. (स्था.पो.)


5. आसन स्थान :

हे स्थान ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या टाकीच्या ईशान्येस जवळच आहे. श्रीगोविंदप्रभूच्या वेळी येथे घोडवडी होती.

लीळा : श्रीगोविंदप्रभू रिद्धपूरहन बेलोऱ्याला आल्यावर त्यांना प्रथम येथे आसन झाले. घोडवडीतील सेवकांनी अर्पण केलेले विजुळी सोले त्यांनी आरोगण केले. (ऋ. प्रत लीळा 21, स्था, पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील पाचही स्थाने.


श्रीचक्रधर चरणांकित स्थाने

6. भीमेश्वरी वसती स्थान :

हे स्थान बेलोरा गावाच्या नैर्ऋत्य विभागी लिंबाच्या झाडाखाली आहे. स्थानावर लहान देऊळही आहे. आजही हे ठिकाण ‘भीमेश्वर’ या नावानेच ओळखले जाते.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात रिद्धपूरहन बेलोऱ्याला आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून शिराळ्याला गेले.


7. परिश्रय स्थान :

हे स्थान वसती स्थानाच्या नैर्ऋत्येस उत्तराभिमुख देवळात आहे. (स्था.पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा) वरील दोन स्थाने.


8. आसन स्थान :

हे स्थान बेलोरा गावाच्या उत्तरेस 400 मीटर अंतरावर काशी नदीच्या पूर्व काठी शंखेश्वराच्या (महादेवाच्या) दक्षिणाभिमुख देवळाच्या पूर्व बाजूस आहे.

लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू रिद्धपूरहून बेलोऱ्याला आल्यावर त्यांना प्रथम येथे आसन झाले. पूजा आरोगणा झाली. (स्था. पो. उ. को. प्र.) 

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


9. बेलजयेशी खेळ करणे स्थान (श्रीगोविंदप्रभू चरणांकित) :

हे स्थान बेलोऱ्यापासून एक कि. मी. अंतरावर बेलोरा-रिद्धपूर बैलगाडी रस्त्याच्या पूर्वेस 300 मीटर वर श्री. वजीरभाई यांच्या शेतात विहिरीजवळ लिंबाच्या झाडाखाली आहे.

लीळा : श्रीगोविंदप्रभुंनी रिद्धपूरहन बेलोऱ्याला जाताना येथे पालखी थांबवून बेलजय देवतेच्या प्रतिमेशी खेळ गेला. (स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


अनुपलब्ध स्थाने :

1. शंखनाथी न्हाणीए पूर्वेचे आमच्या सर्वज्ञांचे आसन स्थान

2. देवळाच्या उत्तरेचे मादने स्थान

3. आड अवलोकणे स्थान

4. परिश्रय स्थान 


बेलोऱ्याची एकूण स्थाने : 13


  • Purvardha Charitra Lila – 169
  • Belora : बेलौरां शंखनाथीं वसति :॥:
  • मग गोसावी बेलौरयां बीजे केले : मार्गि बाइसें भेटलीं: शंखनाथीं उत्तरीली भीडीं गोसावीयांसिं आसन जालेः गोसावीयांसिं बहुतां दिवसा मादने नाहीं: म्हणौनि बाइसीं विनविलेः गोसावी विनति स्वीकरिलीः शंखनाथामागें न्हाणियेसमिप मर्दनामादनें जालें: मग शंखनाथाचां चौकीं विळीचाचा पूजावसरु जालाः अवघेया दिसांची बाइसीं पूजा केलीः आरोगणा जाली : तेथ शंखनाथीं वसति जालीः उदयाचि पूजावसरानंतरे बीजे केले :॥:



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: