Phaltan (फलटण)

फलटण, ता. फलटण, जि. सातारा


येथील स्थाने - 13
1. श्रीचक्रपानी जन्मस्थान - फलटन शहरातच पश्चिमेकडे, बारस्कर आळीत, बाणगांगा नदीचे काठावर जन्मस्थान मंदीर आहे. जन्मस्थान मंदीरात 1 स्थान आहेत.  

2.  श्रीकृष्ण मंदिर, 'बाबासाहेब' मंदिर - फलटन शहरातच जन्मस्थान मंदिराच्या ईशान्येस रवीवार पेठेत, श्रीकृष्ण मंदिर, 'बाबासाहेब' मंदिर, पाणपेखणे-सर्वतीर्थ मिळून 3 स्थाने. 

3. श्रीचक्रपानी अवस्थान, आबासाहेब मंदीर - फलटन शहरातच दक्षिनेकडे, शुक्रवारपेठेत, आबासाहेब मंदीर. आबासाहेब मंदीरात 1 स्थाने आहेत. (व रंगशिळेच्या पाच भागांपैकी एक भाग)

4. वेदाध्ययन/रंगशीळा स्थान - आबासाहेब मंदीराचे नैऋत्येकडे कासार विहीर आहे व रंगशीळा मंदीर आहे. या ठीकानी 2 स्थाने आहेत. (व रंगशिळेच्या पाच भागांपैकी एक भाग) 

5. माणिकेश्वरी आसन स्थान - फलटन शहरातच, शुक्रवारपेठेत, माणिकेश्वर महादेव मंदीर. या मंदीरात 1 स्थान आहे, सभामंडप/चौक म्हणजे हे 1 स्थान होय.

6. नदी पलीकडे मलटन तळे - 1 स्थान.

7. मलटन 'श्रीदत्त' मंदिर - मलटन तळ्याच्या जवळ श्रीदत्त' मंदिर नावाने प्रसिध्द भुवनेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवाळाच्या चौकात 1 स्थान आहे, बाजूला 2 स्थाने -  एकूण 3 स्थाने.

8. विहरण स्थान-सदाशिव महादेव मंदीर - मलटन तळ्याजवळील श्रीदत्त' मंदिर च्या परिसरात सदाशिव महादेव मंदीर. या मंदीरात 1 स्थान आहे, सभामंडप/चौक म्हणजे हे 1 स्थान होय.

(स्थाने विखुरलेली असल्याने व्यवस्थित चौकशी करुन करावी लागतात, नाहीतर स्थाने सुटतात)


जाण्याचा मार्ग :

फलटण हे शहर महाड-पंढरपूर मार्गावर लोणंदहून आग्नेयेस 28 कि. मी. आहे. व माळशिरसहून वायव्येस 55 कि. मी. आहे. पुण्याहून आग्नेयेस फलटण (सासवड, नीरा, लोणंदमार्गे) 107 कि. मी. आहे. अहमदनगर ते फलटण (मिरजगाव, कर्जतमार्ग) 172 कि. मी. आहे, व (कोळगाव, दौंड मार्गे) 140 कि. मी. आहे. सातारा ते फलटण 70 कि. मी. बारामती ते फलटण 25 कि. मी. फलटणला जाण्यासाठी महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांहून एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. पुणे-बंगलोर लोहमार्गावरील लोणंद रेल्वे स्थानकावर उतरून फलटणला जाता येते. त्याच्याप्रमाणे दौडहून बारामतीला लोहमागनि येऊन तेथून फलटणला जाता येते.
फलटण येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी जन्मस्थान मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, आबासाहेब मंदिर, रंगशिळा मंदिर रविवार पेठ, श्रीदत्त मंदिर मलटण इत्यादी मंदिराच्या परिसरात धर्मशाळा आहेत. तसेच महानुभाव पंथीयांचे मठही आहेत.


आदौ श्रीफल्लठाणी निजरूप धरूनी क्रीडला चौकदानी । तेथौनी चक्रपाणी विचरत धरणी...

(तीर्थमालिका : एकांकारंभ-3)

बाणगंगा नदीच्या तीरावर वसलेले आणि ऐतिहासिक व प्राचीन परंपरेने नटलेले फलटण हे एक वैभवशाली शहर आहे. त्रेतयुगामध्ये फलस्थ ऋषींचे वास्तव्य या नगरीत होते. त्यावरूनच फलस्थस्थान, फलेठाण व पुढे फलटण हे नाव त्यास प्राप्त झाले.

धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे या भगवदुक्तीनुसार पूर्ण परब्रह्म परमेश्वर प्रत्येक युगात अवतार धारण करून मानव जीवांना ज्ञान, प्रेम, भक्ती देऊन त्यांच्या उद्धरणाचे कार्य करीत असतात. या कलियुगात त्या परमेश्वराने शकाच्या अकराव्या शतकात फलटण येथे ‘श्रीचक्रपाणी’ नामे अवतार धारण करून जीवांच्या उद्धरण कार्यास प्रारंभ केला. श्रीचक्रपाणीप्रभूचे फलटणमध्ये सुमारे 37 वर्षे वास्तव्य होते. त्यानंतर ते येथून माहूरला गेले. त्यांच्या अगाध, अगम्य, अघटित लीलेने, पदस्पर्शाने आणि विहाराने फलटण व फलटणचा सर्व परिसर परम पवित्र झालेला आहे. त्याप्रमाणे त्रेतायुगात श्रीदत्तात्रेयप्रभू, द्वापारयुगात भगवान श्रीकृष्ण या परमेश्वरी अवतारांचाही संबंध फलटणनगरीशी आलेला आहे. म्हणून फलटणचे महत्त्व हे वाराणसीहूनही आगळे व वेगळे आहे. आज हे शहर ‘महानुभावांची दक्षिण काशी’ म्हणून अखिल विश्वात ओळखले जाते.
श्रीचक्रपाणीप्रभूच्या प्रदीर्घ वास्तव्याने पावन झालेली शेकडो स्थाने फलटण व फलटणच्या परिसरात होती. त्यातील बहुतांशी स्थाने कालौघात दृष्टीआड झालेली आहेत. आज फक्त जन्मस्थान मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्रीचक्रपाणी मंदिर, रंगशिळा मंदिर, श्रीदत्त मंदिर येथील स्थाने व इतर थोडी फार स्थाने उपलब्ध आहेत, ती आम्ही क्रमाने देत आहोत.


स्थानाची माहिती :

1. श्रीचक्रपाणीप्रभूचे जन्मस्थान स्थान :

हे स्थान फलटण शहराच्या पश्चिम विभागी शुक्रवार पेठेत बाणगंगा नदीच्या दक्षिण काठावर पूर्वाभिमुख देवळात आहे. हे देऊळ, ‘जन्मस्थान मंदिर तथा अवस्थान मंदिर’ या नावाने ओळखले जाते. प्राचीनकाळी येथे जनकनायकांचा वाडा होता. त्यावेळी या विभागास ‘ब्रह्मपुरी’ हे नाव होते.

लीळा : या ठिकाणी परमेश्वर अवतार श्रीचक्रपाणीप्रभू यांचा जन्म शके 1043 मध्ये आश्विन वद्य नवमीस गुरुवारी पहाटेच्या वेळी कहाड़े ब्राह्मणाच्या कुळात झाला. त्यांच्या आईचे नाव जनकाइसा व वडिलांचे नाव जनकनायक, त्यांच्या मातोश्री जनकाइसा यांनी याच ठिकाणी श्रीचक्रपाणीप्रभूचे त्यांच्या जन्मानंतर एक वर्ष संगोपन केले. तसेच वयाच्या 12 व्या वर्षांपासून 37 व्या वर्षांपर्यंत त्यांचे याच ठिकाणी वास्तव्य होते. (श्रीच. च. ली. 9, फ. स्था. पो.)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


श्रीकृष्ण मंदिरातील स्थाने :

श्रीकृष्ण मंदिर, जन्मस्थान मंदिराच्या ईशान्येस बाणगंगा नदीच्या पूर्व काठावर पूर्वाभिमुख आहे. हे मंदिर, ‘बाबासाहेब’ मंदिर या नावानेही ओळखले जाते.

2. गाभाऱ्यातील स्थान :

हे स्थान श्रीकृष्ण मंदिरात पूर्वाभिमुख गाभाऱ्यात आहे.

लीळा : ढवळानगरीच्या सिंघण राजाने या गाभाऱ्यात श्रीकृष्ण मूर्तीची स्थापना केली होती. श्रीचक्रपाणीप्रभू दररोज सकाळी बाणगंगा नदीवर स्नान करून आल्यावर येथील श्रीकृष्ण मूर्तीस फुले वाहत असत. ती मूर्ती सध्या या गाभान्यात नाही. काळाच्या ओघात गेली असावी. हा गाभारा श्रीचक्रपाणीप्रभूच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेला असून संपूर्ण नमस्कारी आहे. म्हणून बाहेर उभे राहूनच नमस्कार करावा. तसेच या गाभाऱ्याच्या दारसंका व उंवरा नमस्कारी आहे. (श्रीच.च.ली.7, 18)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


3. पटीशाळेवरील आसन स्थान :

हे स्थान गाभाऱ्याच्या पूर्व वाजूस उत्तर-दक्षिण, पूर्वाभिमुख पटीशाळेत दोन खांबांमध्ये आहे. या स्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूचा खांब नमस्कारी आहे.

लीळा : श्रीचक्रपाणीप्रभू दररोज दुपारच्या वेळेस ओट्यावर बसून गावातील महाजन मंडळींना शास्थार्थ निरूपण करीत असत आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांचे समाधान करीत. (श्रीच. च. ली. 19.

येथील इतर लीळा : 1. गाभाऱ्यातील श्रीकृष्णमूर्तीस फुले बाहिल्यानंतर दोन्ही खांबांमध्ये दहा प्रकारे आसने करून बसणे (श्रीच. च. ली.18)

2. इच्छित जनांचे मनोरथ पूर्ण करणे. (श्रीच. च. ली.18)

3. ब्राह्मणांच्या मुलास वाचा देणे. (श्रीच. च. ली, 25)

4. ऋग्वेदी ब्राह्मणाच्या मुलास भूतबाधेपासून मुक्त करणे. (श्रीच. च, ली. 26)

5. अद्वैत पंडितास निरूत्तर करणे (श्रीच. च. ली.29)

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


4. पाणपेखणे सर्वतीर्थ :

हे तीर्थ पटीशाळेवरील आसन स्थानाच्या पूर्व बाजूस आहे.

लीळा : 1. त्रेतायुगामध्ये श्रीदत्तात्रेयप्रभूनी या उदकामध्ये श्रीचरण प्रक्षाळण केले म्हणून या तीर्थास ‘सर्वतीर्थ’ असे म्हणतात. (श्रीच. च. ली. 5)

2. विराट राजाची मुलगी उत्तरा, हिच्या विवाहासाठी भगवान श्रीकृष्ण, सुभद्रा व अभिमन्यू यांना आपल्याबरोबर विराटनगरीला घेऊन जात असताना त्यांचा या ठिकाणी एक रात्र मुक्काम होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी या तीर्थामध्ये श्रीकर प्रक्षाळण केले. (श्रीच. च. ली. 6)

3. श्रीचक्रपाणीप्रभू दररोज सकाळी श्रीकृष्ण मंदिरातून बाहेर जातांना पाणपेखणे अवलोकन करीत आणि पर्वाच्याप्रसंगी पाणपेखण्यामध्ये स्नान करीत (श्रीच. च.ली.18)

अशाप्रकारे त्रेत, द्वापार, कली या तीन युगांत अनुक्रमे श्रीदत्तात्रेयप्रभू, भगवान श्रीकृष्ण, श्रीचक्रपाणीप्रभू या तीन अवतारांचा पाणपेखण्यास संबंध आहे. या तीर्थामुळे ढवळानगरीच्या सिंघण राजाची सर्वांगी असलेली कोडाची व्यथा दूर झाली. आजही या तीर्थामुळे कुष्ट, कोड यासारखे असाध्य रोग पूर्णपणे बरे होतात.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


उर्पुवरित स्थान पुढील पेज वर आहेत, पेज 2 वर ज्याण्यासाठी ‘2’ वर क्लिक करा… 👇🏾👇🏾👇🏾