नाथसागरातील महानुभाव तीर्थस्थान

येथे नाथसागरात बुडालेल्या व दुष्काळात उपलब्ध असलेल्या 15 स्थानांची गावे/ठिकाणे दिलेली आहेत, ती स्थाने औरंगाबादअहमदनगर जिल्ह्याच्या सीमेच्या अंतर्गत येतात, ते 4 तालुक्याप्रमाणे खाली दिलेली आहेत. त्यानंतर 6 नेहमी अनुपलब्ध स्थानांची गावे सुद्धा दिली आहेत.

पूर्ण स्थान करावयाची असल्यास शेवटी दिलेला रूट पहावा


Nevasa, Ahamadnagar.

PravaraSangam (प्रवरासंगम)

Galnimb (Dakshin) (गळनिंब-दक्षिण)

Koteshwar (कोटेश्वर)

Suregaon (Dahigaon) (सुरेगाव-दहिगाव)

Warkhed (Ghatsiddnath) (वरखेड-घटसिद्दनाथ)

Bramhani (Ramdoh) (ब्राह्मणी)


Gangapur, Aurangabad.

Galnimb-Uttar (गळनिंब-उत्तर)

Agarwadgaon (आगरवडगाव)

Savkheda-Sangmeshwar 1 (सावखेड-संगमेश्वर 1)

Khadkuli-Sangmeshwar 2 (Gaywada) (खडकुली-संगमेश्वर 2) (गायवाडा)

Khadkuli-Chinch Kapat (खडकुली-चिंच कपाट)

Khadkuli-Sangmeshwar 3 (Shri Chakradhar Mandir) (खडकुली-संगमेश्वर 3)


Paithan, Aurangabad.

Jogeshwari (जोगेश्वरी)


Shevgaon, Ahamadnagar.

Khirdi (खिर्डी)

RanJogeshwari-Vruddhasangam (रानजोगेश्वरी-वृद्धासंगम)


अनुपलब्ध स्थानांची गावे


Paithan, Aurangabad.

Bramhangaon (ब्राम्हणगांव)

Savita (सविता)


Shevgaon, Ahamadnagar.

Deolane (देवळाणे)


Nevasa, Ahamadnagar.

Kalegaon (कोळेगाव)

Tokegavhan (टोकेगव्हाण)


नाथसागरात बुडालेली स्थाने संपूर्ण.


नाथसागरात बुडालेल्या व दुष्काळात उपलब्ध असलेले पूर्ण 15 स्थानांची गावे/ठिकाणे करावयाची असल्यास पैठणहुन काढलेला रूट पुढीलप्रमाणे. रोडवर पडत असल्याने यात 1 स्थान घोटण घातलेले आहे.


वेळ – 1 मे च्या नंतर ते 15 जून च्या पूर्वी… काही स्थाने (दुष्काळात पूर्ण स्थाने होतील)

मार्ग – पैठण वरून… (गोदावरी-नाथसागर दक्षिण काठ) Recommended

पैठणघोटण > शेवगाव > कुकाना > गेवराई > शिरसगाव > वरखेड > रामडोह > होडी/नावेने – खडकुली-(संगमेश्वर 3) > होडी/नावेने – खडकुली-संगमेश्वर 2 (गायवाडा) > होडी/नावेने – खडकुली (चिंच कपाट) > वापस होडी/नावेने – रामडोह > रामडोह-ब्राह्मणी > वरखेड-घटसिद्दनाथ > वरखेड (नवे) > होडी/नावेने – आगरवडगाव > वापस होडी/नावेने – वरखेड (नवे) > सुरेगाव > सुरेगाव-दहिगाव कोटेश्वर > वापस सुरेगाव > गळनिंब > गळनिंब-दक्षिण > होडी/नावेने गळनिंब-उत्तर > वापस गळनिंब > मंगळापूर > प्रवरासंगम (नगर-औरंगाबाद मेन रोड वर)


मार्ग – गंगापूरवरून… (गोदावरी-नाथसागर उत्तर काठ)

औरंगाबाद-नगर राज्यमार्गावर भेंडाळा फाटा > भेंडाळा > भुईधानोरा > धनगरपट्टी > आगरवाडगाव नवे > आगरवडगाव > होडी/नावेने – रामडोह-ब्राह्मणी > वरखेड-घटसिद्दनाथ > होडी/नावेने – खडकुली-(संगमेश्वर 3) > होडी/नावेने – खडकुली-संगमेश्वर 2 (गायवाडा) > होडी/नावेने – खडकुली (चिंच कपाट) > वापस होडी/नावेने आगरवाडगाव नवे > होडी/नावेने –सुरेगाव-दहिगाव > होडी/नावेने – कोटेश्वर > वापस होडी/नावेने > आगरवाडगाव नवे > गळनिंब लिफट >गळनिंब-उत्तर > होडी/नावेने > गळनिंब-दक्षिण > वापस होडी/नावेने गळनिंब लिफट > धनगरपट्टी > भुईधानोरा > भेंडाळा > भेंडाळा फाटा औरंगाबाद-नगर राज्यमार्गावर.


सावखेड-संगमेश्वर हे नेहमी बुडीत असले तरी दुष्काळात संगमेश्वराच्या मंदिराची भिंत दिसू लागते, त्या साठी खडकुली-(संगमेश्वर 3) वरून होडी/नावेने जावे लागते, किंवा रोड ने नवे सावखेड गावात जायचे असल्यास गंगापूरवरच्या रूट मध्ये औरंगाबाद-नगर राज्यमार्गावर भेंडाळा फाटावरून न जाता ढोरेगाव फाटा वरून जावे किंवा आगरवाडगाव नवेगळनिंब लिफट वरून वापस येताना… 👇🏻

आगरवाडगाव नवेगळनिंब लिफट > भुईधानोरा > पाखोरा > पुरी > नंद्राबाद > हम्जाबाद > झनझर्डी > हर्सूळी > नवे सावखेडा > सावखेड-संगमेश्वर (नवे सावखेडा गावापासून आग्नेयेस 4 कि.मी. अंतरावर महानुभाव आश्रम आहे. तेथे सर्व व्यवस्था आहे. संपर्क तपस्विनी कपाटे आई मो. नं. 8605882561) (येथून सुद्धा नावेने खडकुली-संगमेश्वर ची स्थाने करता येतात)


जोगेश्वरी हे स्थान नवे जोगेश्वरी गावाच्या पश्चिम विभागी 3 कि.मी. असले तरी ते नेहमी पाण्यात बुडून असते. उन्हाळ्यात पाणी कमी झाल्यास जोगेश्वरी मंदिराचा कळस दिसू लागतो. दुष्काळात पाणी खूपच कमी झाले तेव्हा होडी/नावेने जाता येते. इथून खडकुली होडी/नावेने 3 कि.मी. आहे. नवे जोगेश्वरी गाव ते खडकुली परिसर होडी/नावेने 6 कि.मी. आहे. दुष्काळात जोगेश्वरी ला जाण्यासाठी आम्ही खाली रूट देत आहोत.

औरंगाबाद-नगर राज्यमार्गावरून ढोरकिन वरून पश्चिमेस जोगेश्वरी 17 कि.मी.

किंवा खडकुली वरून होडी/नावेने 3 कि.मी. गेल्यास नवे जोगेश्वरी गावात जावे लागणार नाही.

किंवा जेव्हा तुम्ही रामडोह किनाऱ्यावरून होडी/नावेने खडकुली ला जाण्यास निघाले तेव्हा सुद्धा गाव जोगेश्वरी चे स्थान पूर्वेकडे 3 कि.मी. करून मग उत्तरेकडे खडकुली 2 कि.मी. ला जाता येते.


खिर्डी हे गाव घोटण स्थानापासून 11 कि.मी. आहे. हे स्थान सुद्धा नाथसागर धरनात लुप्त झालेले असल्यामुळे वंदनास उपलब्ध नाही. पण 2019 सारखी दुष्काळाच्या वेळी “आपदा में अवसर” सारखे प्रसंगी हे स्थान खुले होतात. 2019 मध्ये तब्बल 44 वर्षांनी हे स्थान खुले झाले. येथे वांबोरी आश्रमातील महाताम्यांनी पुन्हा स्थानाच्या जागा निर्धारित करून ओटे बांधले असले तरी आता ते पुन्हा बुडाले आहेत. म्हणून जेव्हा ही पाणी कमी झाले तेव्हा विचारून जावे. खिरडी टेकाड हे गाव जलाशयात आहे. पण गावाच्या पश्चिम विभागी असलेले स्थान 2019 मध्ये दुष्काळी परिस्थिती मुळे धरणाच्या पाणी पातळीकमी झाल्याने उघडे झालेले होते…

पैठणघोटण > एरंडगाव फाटा > एरंडगाव > खिरडी टेकाड


रानजोगेश्वरी (वृद्धासंगम) हे स्थान खिरडी स्थानापासून उत्तरपूर्वेस (ईशान्येस) दीड अथवा 3 कि.मी. आहे असे बोलल्या जाते. कारण हे ठिकाण मुख्य धरणाच्या जवळ आहे आणि येथून पैठण 5 कि.मी. आहे. म्हणून हे स्थान कधीच खुले होणार नाही असे समजते. जेव्हा 44 वर्षांनी खिर्डी चे स्थान खुले झाले तसेच खूप दुष्काळी परस्थितीत झाले तरच हे स्थान करने शक्य होईल.