नायगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहमदनगर
येथील 1 स्थान - जुन्या नायगांव पासून 1 कि.मी.अंतरावर पुणतांबा रोडच्या बाजुलाच लहानश्या मंदीरात आहे.
जाण्याचा मार्ग :
श्रीरामपूर-नाऊर मार्गावरील नायगाव फाट्याहुन नायगावला जाता येते, पुणतांबा ते जुने नायगाव 7 कि.मी. हिंगोणीहून आग्नेयेस नायगाव (डोक नांदूर, हिरडे वस्ती मार्गे) 8 कि.मी. आहे. नायगाव व नायगाव फाट्यापर्यंत जाण्यासाठी एस. टी. बस सेवा उपलब्ध आहे. नायगाव येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाची माहिती :
1. आसन स्थान :
हे स्थान जुन्या नायगावच्या नैर्ऋत्येस एक फर्लाग अंतरावर पुणतांबा रस्त्याच्या दक्षिणेस तरटीच्या झाडाखाली पूर्वाभिमुख लहान देवळात आहे.
लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात पुणतांब्याहून नायगावला आले. त्यांना येथे थोडा वेळ आसन झाले. तेवढ्यात दायंबा आले. सर्वज्ञांची व दायंबांची भेट झाली. (पू. ली. 284 ख. प्र., स्था. पो.) त्यानंतर ते तेथून नाऊरला गेले.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)
नायगावचे स्थान : 1
- Purvardha Charitra Lila – 280
- Naigaon : नायगावीं दायंबा भेटी :॥:
- गोसावी नायगावां बीजे केलेः गावांपस्चिमे देउळः तेया देउळां गोसावी बीजे केलेः तेथ नावेक आसन जालेः तवं दायंबा पैलिकडौनि आलेः साजेयापासी भेटि जालीः दंडवते घतलीं: पाने पोफळें आसनावरि ठेउनि श्रीचरणां लागलेः मग साजा गनेशीं गोसावियांसी नावेक आसन जालेः गोसावी बैसा म्हणितलें: दायंबा गोसावियांपूढा बैसलेः गोसावी पूसिलेः तुमचें कुटुंब निकेनी असेः दायंबाये म्हणितलेंः जीजी निकें जीः मग गोसावी तेथौनि बीजे केले :॥:
- (..येथे हे पहील्यांदा येने. स्वामी नासिक-सुकिना-नांदौर-कुंकुमठाण-पुणतांब्यावरुण आले व नाउरकडे निघले…)