लेणे क्रमांक 6 :

लेणे क्रमांक 6.


लेणे क्र. 6 - लेण्याला नाव नाही - येथील 1 स्थान. 
1) विहरण स्थान - पश्चिमाभिमुख 4 खांबांच्या पटीशाळेच्या प्रवेशाजवळचा मधल्या दोन खांबामधील उत्तरेकडील जागा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


वास्तुविधानाच्या दृष्टीने या लेण्याचे तीन भाग पडतात. यांतील दर्शनी भागाचे स्तंभ शालभंजिकांच्या सुंदर शिल्पांनी अलंकृत केलेले होते, असे त्यांच्या अवशिष्ट स्वरपावरून दिसते. मधल्या भागात मंडप, त्यामागे अंतराल आणि त्यामागे बुद्धमंदिर आहे. दोन्ही बाजूंस दोन मोठे मंडप आणि बाजूंना नऊ खोल्या आहेत. मुख्य मंडपाचे छत कोसळल्यानंतर लाकडी छत बसविल्याच्या खुरा येथे दिसून येतात. स्तंभावर घटपल्लव (कलश आणि त्यातून डोकावणारी पाने) कोरलेले असून स्तंभाच्या वरच्या भागावर शार्दूल हस्त (ब्रॅकेट) आहेत. अंतरालात द्वारपाल वज्रपाणी व अवलोकितेश्वर यांच्या भव्य मूर्ती आहेत. त्यावर पुष्पहार घेतलेले विद्याधर आहेत. डावीकडील भिंतीवर तारादेवी आणि उजव्या भिंतीवर महामयूरी यांची सुंदर शिल्पे आहेत. मयूरवाहनाखालील बाजूस पोथी वाचत असलेला भिक्षू कोरलेला असून वर अंतराळात विद्याधर दाखविलेले आहेत. येथील गाभाऱ्याची द्वारशाखा अलंकरणामुळे उल्लेखनीय ठरते. यातील गंगा-यमुनेच्या लहान मूर्ती अत्यंत नेटक्या आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

विहरण स्थान :

पश्चिमाभिमुख 4 खांबांच्या पटीशाळेच्या प्रवेशाजवळचा मधल्या दोन खांबामधील उत्तरेकडील जागा नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 6 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: