लेणे क्रमांक 5 :

लेणे क्रमांक 5.


लेणे क्र. 5 - लेण्याला नाव नाही - येथील 1 स्थान. 
1) विहरण स्थान - पटीशाळेच्या भंगलेल्या खांबांमधील जागा नमस्कारी आहे. व पाषानाचा चौरंग नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


हे लेणे सर्वांत प्रचंड (35·66 X 17·67 मी.) आहे. या लेण्याला “महारवाडा” असे नाव प्रचलित असले, तरी ”महाविहार” याचा हा अपभ्रंश असावा. गाभारा, दालन, मुख्य मंडप आणि दोन्ही बाजूंच्या पडव्या अशी याची विभागणी करता येते. दहा खांबांच्या दोन रांगांमुळे निरुंद पडव्या निर्माण झाल्या आहेत. दर्शनी भागात चार स्तंभ आहेत, तर पाठीमागे अंतराल असून भिंतीत मध्यभागी बुद्धप्रतिमा असलेले मंदिर आहे. अंतरालाला लागून दोन खोल्या, तर मंडपाच्या लगत एकूण सतरा खोल्या आहेत. सर्वसाधारणपणे या लेण्याची रचना चैत्यगृहाप्रमाणे आहे परंतु गाभाऱ्याची बाजू अर्धगोलाकृती नाही. लेण्याचे छतसुद्धा सपाट आहे. चैत्यगृहामध्ये आढळतो तसा स्तूप नाही प्रदक्षिणापथही नाही. गाभाऱ्यात प्रलंबपादासनात बसलेली बुद्धाची मूर्ती धर्मचक्रप्रवर्तनमुद्रेत आहे. मंदिराबाहेर डाव्या बाजूची अवलोकितेश्वराची मूर्ती कमलनाल आणि अक्षमाला घेतलेली आणि खांद्यावर मृगाजिन ल्यालेली आहे तर दुसरी मुकुटधारी व अलंकार ल्यालेली आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

विहरण स्थान :

पटीशाळेच्या भंगलेल्या खांबांमधील जागा नमस्कारी आहे. व पाषानाचा चौरंग नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 5 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: