लेणे क्रमांक 3 :

लेणे क्रमांक 3.


लेणे क्र. 3 - लेण्याला नाव नाही - येथील 1 स्थान. 
1) विहरण स्थान - लेण्याचे आतील संपूर्ण चौक नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


शिल्पे, शिल्पपट आणि अलंकृत स्तंभ ही या पडझड झालेल्या लेण्याची वैशिष्ट्ये आहेत. त्याच्या उत्तरेकडील भिंतीवर एक शिल्पपट आहे. अग्नी, मारेकारी आणि जलप्रवासातील आपत्ती यांच्यापासून अवलोकितेश्वर संरक्षण करीत आहे, अशा आशयाचा हा शिल्पपट असून यातच उजव्या बाजूला सिंह, नाग, हत्ती व पिशाच्चे यांसारख्या आपत्तींपासूनही तो रक्षण करतो, हे या शिल्पातून दाखविले आहे. बुद्ध आणि बोधिसत्त्वाचे बदलते आणि भौतिकतेकडे झुकणारे स्वरूप या शिल्पपटातून सूचित होते. मध्यभागी असलेल्या मंडपात बारा खांब असून त्यांवर पूर्ण कलश आणि पत्रपल्लवी कोरलेल्या आहेत. मंडपाच्या बाजूच्या दोन्ही भिंतींत आठ, तर गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंसही दोन खोल्या असून गर्भगृहात बुद्धमूर्ती आहे. द्वारपालांपैकी डाव्या बाजूची मूर्ती अवलोकितेश्वराची आहे.

या लेण्याच्या उत्तरेच्या भिंतीत प्रलंबपाद आसनातील, धर्मचक्रप्रवर्तन मुद्रेतील बुद्धमूर्ती व अवलोकितेश्वराचा शिल्पपट आहे. उजव्या भिंतीवर तारा व वज्रयान दैवतसमूहातील देवतेचे शिल्प आहे.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

विहरण स्थान :

लेण्याचे आतील संपूर्ण चौक नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 3 चे स्थान : 1


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: