लेणे क्रमांक 2 :

लेणे क्रमांक 2.


लेणे क्र. 2 - लेण्याला नाव नाही - येथील 2 स्थान. 
1) आसन स्थान - लेण्याबाहेरील ओटा नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 
2) विहरण स्थान - लेण्याचे आतील संपूर्ण चौक नमस्कारी आहे. (परंपरने बोलले जाते) 


हे लेणे मंदिर आणि निवास अशा दोहोंसाठी उपयोगी पडत असावे. मात्र यात फक्त दोनच खोल्या निवासासाठी आहेत. मागील भिंतीत गर्भगृह व बाजूच्या बुद्धमूर्ती असलेल्या भिंती येथे आहेत. गर्भगृहात धर्मचक्रप्रवर्दनमुद्रेत सिंहासनावर बुद्धाची मूर्ती असून, डाव्या बाजूस अवलोकितेश्वर बोधिसत्त्वाची मूर्ती आहे. उजव्या बाजूच्या दुसऱ्या बोधिसत्त्वाच्या मुकुटात स्तूपाची प्रतिमा आहे. गर्भगृहातील बुद्धमूर्तीच्या वर दोन्ही बाजूंना फुलांची माळ घेतलेल्या गंधर्वांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या बाहेर दोन्ही बाजूंना द्वारपाल असून त्यांतील (डाव्या बाजूचा) अक्षमाला आणि कमलपुष्प घेतलेला पद्मपाणी अवलोकितेश्वर आहे. उजव्या बाजूचा द्वाररक्षक उत्कृष्ट शिरोभूषणांनी अलंकृत केलेला वज्रपाणी अवलोकितेश्वर आहे. ही मूर्ती काहींच्या मते बोधिसत्त्व मंजुश्रीची असावी.

या लेण्याला प्रवेशमंडप असावा पण तो आता अस्तित्वात नाही. यात अत्यंत प्रेक्षणीय अशी जंभालाची (बौद्ध धर्मीयांचा कुबेर) मूर्ती आहे. त्याच्या बाजूस चवरी घेतलेले सेवक आहेत.

या प्रवेशमंडपातून आत गेल्यावर बारा खांबांचा चौकोनी मंडप आहे. त्या मंडपाच्या दोन्ही बाजूंस प्रचंड आकाराच्या पाच बुद्धमूर्ती आहेत.

Google Map Location Link 👈 (किल्क करा)


स्थानाची माहिती :

आसन स्थान :

लेण्याबाहेरील ओटा नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


विहरण स्थान :

लेण्याचे आतील संपूर्ण चौक नमस्कारी आहे. असे परंपरने बोलले जाते.


लेणे क्रमांक 2 चे स्थान : 2


  • Purvardha Charitra Lila –



या स्थानाबद्दल काही अजून माहिती किंवा करेक्शन असल्यास आम्हाला खाली आपला इमेल टाकून मेसेज करा:
Name:

E-mail:

Comment: