इशाळुवाचे लेणे
जुने नाव - ईशाळुवाचे लेणे - येथील 1 स्थान. 1) आसनस्थान - अनकैच्या लेण्याजवळून डोंगरावर चढताना डोंगराच्या मधोमध ईशाळुवाचे लेणे आहे, येथील पूर्व-पश्चिम पटीशाळेच्या खांबाजवळ जागा नमस्कारी आहे. परंपरने पश्चिमेकडील खांबाजवळ नमस्कार करण्याची पद्धत आहे.
गोमटदेव लेण्याच्या उत्तरेस व अनकैए लेण्याच्या ईशान्येस दूर अंतरावर डोंगराच्या मध्याच्याही वरच्या बाजूला इशाळूवाचे दक्षिणाभिमुख लेणे आहे.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)
स्थानाची माहिती :
50. आसन स्थान :
गोमटदेव लेण्याच्या उत्तरेस व अनकैए लेण्याच्या ईशान्येस दूर अंतरावर डोंगराच्या मध्याच्याही वरच्या बाजूला इशाळूवाचे दक्षिणाभिमुख लेणे आहे. पूर्व-पश्चिम पटीशाळेच्या खांबापाशी आसन स्थान आहे. गोमटदेव लेण्यापासून व लेणे क्रमांक 29 पासून इशाळुवाच्या लेण्याकडे जाण्यास रस्ता आहे.
लीळा : कैलास लेण्यातील भुयारात प्रवेश करून सर्वज्ञ सर्वभक्तजनांसह इशाळुवाच्या लेण्याकडे आले. त्यांना खांबापाशी आसन झाले. बाइसांनी सर्वज्ञांचे श्रीचरण प्रक्षाळण केले. (पू.ली. 187, स्था.पो.)
इशाळुवाचे लेणे चे स्थान : 1
- Purvardha Charitra Lila –