Verul (वेरूळ लेणे)

वेरूळ, ता. खुलाताबाद, जि. औरंगाबाद


वेरुळ येथील स्थाने जवळपास सर्व (34) लेण्यांमधे, अनकैकडे व इतर ठिकाणी आहेत - (सर्व स्थाने नमस्करावयाची असल्यास वेरुळ येथील आश्रम मधुन भिक्षुकांना सोबत घ्यावे. येथील स्थानांना चंदन/गंधाक्षता वाहिलेले नसते त्यामुळे स्थाने ओळखता येत नाही, अविधी घडतो.)


जाण्याचा मार्ग :

वेरूळ हे गाव, औरंगाबाद-धुळे राज्यमार्गावर औरंगाबादहून वायव्येस 27 कि.मी. आहे व धुळ्याहून आग्नेयेस 117 कि.मी. आहे. (1) चाळीसगाव ते वेरूळ 63 कि.मी. (2) फुलंब्री ते वेरुळ 29 कि.मी (3) वेरूळगाव ते वेरूळ लेणी 1 कि.मी. (4) खुलताबाद ते वेरूळ लेणी 3 कि.मी. वेरूळ येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.


वेळापूरी परम सुंदर देवराजा। क्रीडा करी अनुचरा समवेत वोजा ॥ 

चोवीस दीस नवमास विहार जेथे। ती धन्य भूमि नमिली विहितार्थ तेथे ॥

तीर्थमाळिका-22

सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात दोन वेळा वेरूळला आले. पहिल्या वेळेस ते गदान्याहून वेरूळला आले. त्यावेळी त्यांचे वेरूळ येथे एकूण 10 महिने वास्तव्य होते. त्यापैकी वेरूळ गावाच्या उत्तरेस असलेल्या चतुर्विधाच्या मढात 9 महिने 24 दिवस वास्तव्य होते. आणि राजविहार लेण्यात तीन दिवस व मल्हार वसैएमध्ये तीन दिवस वास्तव्य होते. दुसऱ्या वेळेस सर्वज्ञ फुलशिवऱ्याहून वेरूळला आले. त्यावेळी त्यांचे चतुर्विधाच्या मढात 15 दिवस वास्तव्य होते.

चतुर्विधाच्या मढाचे काळाच्या ओघात अस्तित्व राहिले नाही. त्यामुळे तेथील स्थाने आज उपलब्ध नाहीत. (वैय्यक्तिक शेतात असलेल्या या जागेबद्दल निश्चिती असली तरि शेत मालक ही जागा महानुभावांना दान अथवा विकत सुद्धा देन्यास तयार नाही असे ऐकले आहे.)

तसेच अदंडीनाथाचा मळा – वैय्यक्तिक शेतात असलेल्या या जागेबद्दल निश्चिती असली तरि शेत मालक ही जागा महानुभाव पंथीयांना दान देन्यास तयार नाही असे ऐकले आहे.
सेवाळे तळे – या तलावाच्या पूर्वाभीमुख पश्चिमाभीमुख उत्तराभिमुख दक्षिणाभिमुख पायऱ्या नमस्कारी आहेत. असे एका स्थानपोथीकाराचे मत आहे.

सर्वज्ञ ज्या लेण्यांमध्ये विहरणासाठी जात होते व ज्या लेण्यांमध्ये त्यांचे वास्तव्य घडले, त्या लेण्यांतील स्थाने उपलब्ध आहेत. प्रमुख लेणी 1 ते 34 क्रमांकापर्यंत आहेत. त्यापैकी 10, 11, 12, 14, 15, 16, 21, 22, 27, 28, 29, 32, 33, 34 या क्रमांकांच्या लेण्यांत सर्वज्ञांची स्थाने आहेत. या व्यतिरिक्त अनकाई लेणे, चरणविहिरा, गोमटदेव लेणे, इशाळुवाचे लेणे, उपरकुंडीजवळील जोगेश्वरीचे लेणे इत्यादी लेण्यांतही सर्वज्ञांची स्थाने आहेत. ती आम्ही क्रमाने देत आहोत. लेण्यांची आजची नावे दिली असून प्राचीन नावे कंसात दिली आहेत.

(व शेवटी निर्देशरहित पण परंपरेने बोलले जाणारे स्थानांची लेणे 2 ते 8 व 20 आणि 23 ते 26 दिलेले आहे.)

स्थानाची माहिती :


लेणे क्रमांक 10: विश्वकर्मा सुतार झोपडी (कोकसवाढयाचे लेणे)


लेणे क्रमांक 11 : दो ताल (दुसरा राजविहार)


लेणे क्रमांक 12 : तीन ताल (थोरला राजविहार)


लेणे क्रमांक 14 रावणकी खाई (छायापुरूषाचे लेणे, जाळांधराचे लेणे)


लेणे क्रमांक 15: दशावतार लेणे (धुमेश्वराचे लेणे)


लेणे क्रमांक 16 : कैलास लेणे (माणिकेश्वर लेणे)


लेणे क्रमांक 21 : रामेश्वर लेणे (नागनाथ लेणे)


लेणे क्रमांक 22: नीलकंठ लेणे (केदारनाथ लेणे)


लेणे क्रमांक 27 : जळसेनाचे लेणे


लेणे क्रमांक 28: धारातीर्थ लेणे


लेणे क्रमांक 29 : सिता की न्हाणी (शंकर लेणे/दुमार लेणे)


लेणे क्रमांक 32: इंद्रसभा (काटैवसैए)


लेणे क्रमांक 33: जगन्नाथ सभा (मल्हार वसैए)


लेणे क्रमांक 34


दिगंबर पार्श्वनाथ जैन मंदिर (गोमटदेवाचे लेणे)


अनकैएचे लेणे


इशाळुवाचे लेणे


जोगेश्वरीचे लेणे


चतुर्विध मढ


अदंडीनाथाचा मळा


अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड (सेवाळे तळे)


निर्देशरहित पण परंपरेने बोलले जाणारे स्थान :


वेरूळ येथील पहिल्या वेळेच्या 10 महिन्यांच्या वास्तव्यानंतर सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू माटेगावला गेले व दुसऱ्या वेळेच्या 15 दिवसांच्या वास्तव्यानंतर हातनूरला गेले.


अनुपलब्ध स्थान :

(1) चतुर्विधाच्या मढाचा अंगणी चरणचारी उभे राहणे (2) मढातील अवस्थान (3) मढाच्या पटीशाळेवरील रिंगता डाव्या हाताचे ओट्यावरील दुपारच्या पहूडाचे स्थान (4) मढाच्या पटीशाळेवरील निरूपण करणे स्थान (5) रिगता उजव्या हाताच्या सोंडीवर पाणीभात आरोगणे (6) दुसऱ्या सोंडीवरील आसन (7) मढाच्या अंगणातील मादने (8)पटीशाळेवरील वेढे करणे (9) उत्तर बाजूच्या मढाच्या पटीशाळेच्या दक्षिण सिहाडा आसन (10) मढाच्या पटीशाळेवरील वेढे स्थान (11) मढातील विहरण (12) मढाच्या संदीतील द्रीढपुरूष नामकरण स्थान (13) मढाच्या ईशान्येच्या लिंगाचा देऊळी आसन (14) मढाच्या पश्चिमेचे परिश्रय (15) विहिरी पश्चिमे रवणीएवरी आसन (16) शांतबाइसाशी बोरीबाभूळ शिंपण्याचा विधी निरूपणे (17) चांगदेवभटा निरूपण करणे (18) मढाच्या मागचे लघुपरिश्रय (19)सिवाळेया उत्तरे देऊळी तेथे आसन (20) महालक्ष्मीच्या देवळातील आसन (21) एकवीरेच्या देवळातील आसन (22) विनायकाच्या देवळातील आसन (23) लिंगाच्या देवळातील आसन (24) महाकाळीच्या देवळातील आसन (25) गणेशाचा धाबा आसन (26) नागमठाणाच्या देवळातील आसन (27)नागमठाणाजवळील वडाखालील आसन (28) गावाच्या पूर्वेचे विनायकाच्या देवळातील आसन (29) चक्रपाणीच्या देवळातील आसन (30) नागझरीपाशील सोमनाथाच्या देवळातील आसन (31)चोर कुमति हरणे (32) तळ्याच्या पाळी जयतुंगेच्या देवळातील आसन (33) अग्नीष्टिका आसन (34) अदंडीनाथाच्या गुंफेच्या उत्तरेच्या देवळातील आसन (35) नागझरीए पिंपळाखालील आसन (36) गोपाळाच्या देवळातील आसन (37)संगमेश्वराच्या देवळातील आसन (38) डंडमेश्वराच्या देवळातील आसन (39) घृष्णेश्वरी विहरण (40) सारंगपंडिता श्रीप्रभू दाखविणे स्थान


वेरूळची एकूण स्थाने : 91