पारगाव (घोगस), ता. शिरूर कासर, जि. बीड.
येथील स्थान हे पारगांव (घोगस) गांवच्या मधोमध असलेल्या पारेश्वर महादेव मंदीरात सभामंडप/चौक म्हणजे हे 1 स्थान होय.
जाण्याचा मार्ग :
नागलवाडीहून पूर्वेस पारगाव 2 कि.मी. अंतरावर आहे. पारगाव (घोगस) येथे जाण्यासाठी पाथर्डी पाडळशिंगी मार्गावरील माथुरी गावापासून रस्ता आहे. माथुरी-भगवानगड मार्गावर धोगस पारगाव आहे. पारगावला जाण्यासाठी गेवराईहून एस.टी. बस सेवा उपलब्ध आहे.
स्थानाची माहिती :
1. वसती स्थान :
हे स्थान पारगावच्या मध्यभागी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पारेश्वराच्या (महादेवाच्या) पूर्वाभिमुख देवळाच्या चौकात आहे. चौक नमस्कारी आहे.
लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या उत्तरार्ध काळात चकलांब्याहून पारगावला आले. (उ.ली. 573, स्था. पो.) दुसऱ्या दिवशी ते येथून खरवंडीला गेले.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)
अनुपलब्ध स्थान :
1) गावाच्या पश्चिमेचे काटेरी झाडाखालील आसन स्थान.
पारगावची एकूण स्थाने : 2
- Utarardha Charitra Lila – 573
- Pargaon (Ghogas) : पारेगावीं पारेस्वरी वस्ति :।।:
- उदेयाचां पूजावसर जालेयानंतरे सर्वज्ञें म्हणितलें: ‘‘नायकाः मात्रा कराः एथौनी बिजें किजेलः’’ आउसीं म्हणितलें: ‘‘हो कां जीः’’ म्हणौनि मात्रा केलीः मग गोसावी पारेगावा बिजें केलें: गावापसिमे कांटिये तळी आसनः तेथ पारेस्वराचा देवाली वस्ति जाली :।।:
- (..उत्तरर्धात परिभ्रनण काळात स्वामि पैठण येथुन वृद्धासंगम येथे आले. येथील जोगेस्वरी येथे स्वामींचे दोन महीणे अवस्थानानंतर स्वामि चापडगाव-जवळगाव-नागलवडी-चकलांबा-सेकटा-चकलांबा असा मार्ग क्रमण करित पारेगाव(घोगस) येथे आले व वस्तीस थांबले तेव्हाची ही लीळा…)