गोवर्धन (गंगापूर) ता. नाशिक जि. नाशिक
येथील 1 स्थान - गोवर्धन (गंगापूर) गावाच्या उत्तरेकडे गोदावरी नदीचे तीरावर गंगाधर मंदीर आहे. या मंदीरातील सभामंडप/चौक म्हणजे हे स्थान होय.
जाण्याचा मार्ग :
गंगापूर हे गाव, नाशिक-सारस्ते मार्गावर नाशिकहून वायव्येस 9 कि.मी. आहे. अंजनेरीहुन ईशान्येस गंगापूर (पिंपळगावबहळे, सातपूर मार्गे) 21 कि.मी. आहे. गंगापूरला जाण्यासाठी नाशिकहून सिटी बस सेवा व एस. टी बस सेवा उपलब्ध आहे. गंगापूर येथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासाची सोय आहे.
स्थानाची माहिती :
1. वसती स्थान :
हे स्थान गोवर्धन गावाच्या उत्तर विभागी गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर उत्तराभिमुख देवळात आहे. सर्वज्ञांच्या वेळी येथे गदाधराचे देऊळ होते. त्या देवळाच्या चौकातील हे स्थान होय.
लीळा : सर्वज्ञ श्रीचक्रधरप्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात नाशिकहून गोवर्धनला (गंगापूर) आले. त्यांचे या ठिकाणी एक रात्र वास्तव्य होते. (पू.ली. 249,स्था.पो.) दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून अंजनेरीला गेले.
देवळाच्या अंगणातील स्थान मांडलिक आहे.
Google Map Location Link 👈 (किल्क करा)
अनुपलब्ध स्थाने :
1. गदाधराच्या देवळाच्या पश्चिमेचे भैरवाच्या देवळातील आसन स्थान
2. गंगेच्या पूर्व-पश्चिम पटीशाळेतील आसन स्थान
3. देवळाच्या पश्चिमेचे परिश्रय स्थान
गोवर्धनची एकूण स्थाने : 4
- Purvardha Charitra Lila – 249
- Govardhan (Gangapur) : गोवर्धनी वसति :॥:
- गोसावी गोवर्धनासि बीजे केले : गदाधराचे देउळ पुर्वामुख तेथ चौकी आसन जालेः बाइसीं गोसावीयांचा ठाइं आपुला नित्यनेम केलाः तेथ वसति जाली :॥:
- (.. येथे हे पहील्यांदा येने. स्वामी वेरुळ-सिन्नर-नासिक वरुण आले व त्र्यंबकेश्वरकडे निघाले.)
- Purvardha Charitra Lila –
- Govardhan (Gangapur) : गोवर्धनी गदाधरीं वसति :॥:
- (.. येथील लीळा नाही, फक्त लीळेची आदीच आहे :॥: ..येथे स्वामी दुसर्यांदा आले. स्वामी यावेळी त्र्यंबकेश्वरवरुण आले असताना गोवर्धनला वसतिस थांबले.)